Champions Trophy Shahid Afridi Slams BCCI: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र बीसीसीआयने टीम इंडियाला तिथे पाठवण्यास नकार दिला आहे. या निर्णयापासून स्पर्धेचे ठिकाण आणि वेळेबाबत वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले असून शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी म्हणजे आज एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही मंडळांमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा होऊन समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे. पण त्याआधी पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

शाहिद आफ्रिदीने बीसीसीआयला सुनावलं असून भारतीय बोर्ड क्रीडा आणि राजकारण यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट चिंताजनक स्थितीत पोहोचले आहे. आफ्रिदीनेही हायब्रीड मॉडेलविरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि पाठिंबाही दर्शवला आहे. शाहिद आफ्रिदीने एक्सवर एक पोस्ट केली आहे, या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “थोडं अजून मसालेदार केलं…”, विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भन्नाट उत्तर; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

शाहिद आफ्रिदी पोस्टमध्ये म्हणाला, “बीसीसीआयने राजकारण आणि स्पोर्ट्स यांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनिश्चिततेमध्ये टाकलं आहे. हायब्रीड मॉडेलबाबत मी पीसीबीच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देतो. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेची समस्या असतानाही पाकिस्तान क्रिकेट संघाने ५ वेळा भारताचा दौरा केला. आता आयसीसी आणि बोर्डाच्या संचालकांनी निष्पक्षपातीपणे निर्णय देण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीपूर्वी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार सराव सामना, किती वाजता होणार सुरू? वाचा लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

आयसीसीच्या बैठकीपूर्वी PCB काय म्हणाले?

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताशिवाय आयोजित करण्यास तयार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी आयसीसीला मीटिंगपूर्वीच सांगितले आहे की ते हायब्रिड मॉडेल स्वीकारणार नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी आणखी काही पर्याय शोधावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी नाही, असे लेखी लिहून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, आयसीसीच्या नियमांनुसार, जर संघ म्हणतो की त्यांचे सरकार कोणत्याही मैदानावर दुसऱ्या देशात खेळण्याची परवानगी देत ​​नाही, तर बोर्डाला त्यांच्या सरकारकडून लेखी सूचना द्याव्या लागतील, ज्या आम्ही अद्याप पाहिल्या नाहीत .

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी पराभवानंतर संघात केला मोठा बदल, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला दिली संधी; दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत आयसीसीच्या बैठकीत तीन पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो. त्याचा पहिला पर्याय हायब्रिड मॉडेल आहे, ज्या अंतर्गत टीम इंडिया वगळता सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. दुसऱ्या पर्यायामध्ये ही स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानबाहेर खेळवली जाणार असून ती कुठे खेळवली जाईल यावर चर्चा होईल. मात्र, या कालावधीतही होस्टिंगचे अधिकार पीसीबीकडेच राहतील. तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जावी, पण भारत त्यात सहभागी होणार नाही.

Story img Loader