वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकांशी मी झटापट करायला नको होती. मी जे वागलो त्याचा मला आता पश्चात्ताप होत आहे, असे सिनेअभिनेता व कोलकाता नाइटरायडर्सचा सहमालक शाहरूख खानने सांगितले.
वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकांशी झटापट केल्याबद्दल शाहरुख याला या स्टेडियमवर येण्यास पाच वर्षे मनाई करण्यात आली आहे. ७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स व कोलकाता यांच्यात सामना होणार आहे. त्यावेळी तुम्ही येणार काय, असे विचारले असता शाहरुख हसत हसत म्हणाला, ‘‘समजा मी तेथे आलो तर मला तुम्ही काय करणार? गोळ्या घालणार काय? कदाचित मला एखादा मुखवटा घालून यावे लागेल.
आमच्या संघाला प्रवेश मिळणार आहे ना? मग मला चिंता नाही. आमचा संघ वानखेडेवर निश्चितपणे विजय मिळेल. आमच्या संघातील ब्रेट ली हा अतिशय शिस्तप्रिय व आदर्श खेळाडू आहे. मी कदाचित त्याचा मुखवटा घालून तेथे येईन.’’    

Story img Loader