IPL Auction 2021 : प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघानं आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याला खरेदी केलं आहे. होय… हा कोणी अभिनेता नव्हे तर एक क्रिकेटपटू आहे. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूचा अष्टपैली शाहरुख खान याला प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या युवा अष्टपैलू शाहरुख खान याला पंजाब संघानं पाच कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे.
तामिळनाडूचा युवा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहरुख खान याला आपल्या संघात घेण्यासाठी संघमालकांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. पंजबा आणि आरसीबी या दोन्ही संघानं शाहरुख खान साठी मोठी बोली लावली. मात्र, प्रितीच्या पंजाब संघानं ही बोली जिंकली. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत तामिळनाडूचा Uncapped शाहरुख खानच्या कामगिरीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. पंजाब संघात के. एल राहुल, ख्रिस गेल आणि मयांक अगरवाल यांच्यासारख्या दिग्गजांसोबत शाहरुख आता आपलं नशीब अजमाणार आहे.
शाहरुख खान यानं देशांतर्गत टी-२० सामन्यात दमदार प्रदर्शन करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुख खान यानं ३१ टी २० सामन्यात १३२ च्या स्ट्राईक रेटनं २९३ धावा चोपल्या आहेत. आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.
He goes to @PunjabKingsIPL for 5.25Cr INR @Vivo_India #IPLAuction – WOW
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
IPL 2020 मध्ये पंजाबच्या संघाने धमाकेदार खेळ करून दाखवला. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार कामगिरी करत आपली छाप उमटवली. पण शेवटच्या टप्प्यात केलेल्या चुकांमुळे त्यांना गुणतक्त्यात सहाव्या स्थानी समाधान मानावं लागलं. आता यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे.