Shahrukh Khan says Rinku Singh not a son but a father: आयपीएल २०२३ चा हंगामा भारताच्या युवा खेळाडूसाठी शानदार राहिला. केकेआर संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंगनेही दमदार प्रदर्शन केले. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना या खेळाडूने स्फोटक फलंदाजी केली आणि चाहत्यांच्या मनात घर केले. केकेआरचा मालक शाहरुख खाननेही रिंकू सिंगचे जोरदार कौतुक केले. रविवारी एका चाहत्याने रिंकू सिंगला लहान मुलगा म्हटले, तेव्हा किंग खानने त्याच्याच शैलीत उत्तर दिले.

शाहरुख खानने रविवारी बॉलिवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. विचारताना एका यूजरने शाहरुख खानला प्रश्न विचारताना रिंकू सिंगवर काहीतरी बोलण्यास सांगितले. त्याने ट्विट केले, ‘केकेआरचा लहान मुलगा रिंकू सिंगवर एक शब्द बोलावे?’

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
yograj singh interview video
Yograj Singh: हिंदी ही ‘बायकी’ भाषा, बायकांना अधिकार देऊ नका; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा बरळले
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

शाहरुख खान म्हणाला रिंकू बाप आहे –

शाहरुख खानने ही संधी सोडली नाही. या ट्विटला उत्तर देताना तो म्हणाला, ‘रिंकू हा बाप आहे, लहान मुलगा नव्हे.’ इतकंच नाही तर शाहरुख खानने रिंकू सिंगला आयपीएलदरम्यान एक मोठं वचन दिलं होतं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रिंकूने खुलासा केला की, शाहरुख खानने गुजरातविरुद्ध पाच षटकार मारल्यानंतर त्याला फोन केला होता.

हेही वाचा – WOR vs DER: नवदीप सैनीचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! हॅरी केमला पहिल्याच चेंडूवर केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

शाहरुख खानने रिंकू सिंगला दिला शब्द –

रिंकू सिंग शाहरुख खानबद्दल बोलताना म्हणाला की, “गुजरातविरुद्धच्या मॅचनंतर सरांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितले की, ‘लोक मला त्यांच्या लग्नात बोलावतात, पण मी जात नाही, परंतु मी तुझ्या लग्नात नाचायला नक्की येईन.” शाहरुख खान रिंकू सिंगला सुपरस्टार म्हणाला होता. रिंकू सिंगने आयपीएल २०२३ च्या हंगामात १४ सामन्यात ४७४ धावा केल्या. यादरम्यान रिंकू सिंगची सरासरी ५९.२५ होती. कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.

हेही वाचा – ODI World Cup Qualifiers: वानिंदू हसरंगाने रचला इतिहास, वनडेत ‘हा’ कारनामा करणारा ठरला श्रीलंकेचा पहिला खेळाडू

रिंकू सिंग २०१८ पासून आयपीएल फ्रँचायझी केकेआरचा भाग आहे. पण त्याला लोकप्रिय व्हायला पाच वर्षे लागली. या खेळाडूला ८० लाख रुपयांना २०१८ मध्ये करारबद्ध केले होते. पण २०२२ मध्ये त्याची किंमत फक्त ५५ लाख राहिली. पण त्याच मोसमापासून त्याने नाव कमावण्यास सुरुवात केली. रिंकूने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ७ सामने खेळताना ७ डावात १७४ धावा केल्या होत्या. त्या हंगामापर्यंत तो संघाचा नियमित भाग नव्हता.

Story img Loader