बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन अनेकदा त्याच्या वागण्यामुळे चर्चेत असतो. कधी पंचांशी गैरवर्तन करताना दिसतो, तर कधी चाहत्यांशी उद्धटपणे वाहताना त्याचबरोबर तो अनेकवेळा त्याच्या चाहत्यांशी भिडला आहे. एकदा तर त्याने पत्नीसाठी स्टॅन्डसमध्ये मारहाणही केली होती. आता शाकिब अल हसनचा आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाकिबजवळ एक चाहता सेल्फी काढण्यासाठी येतो, त्याला शाकिब मारहाण करत सेल्फी न देताच हाकलवतो.
शाकिबचा व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ ढाका प्रीमियर लीग मधील आहे. या स्पर्धेत शेख जमाल धानमंडी क्लबकडून शाकिब खेळत आहे. प्राइम बँक क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी शाकिब उभा होता. तेव्हा एक चाहता त्याच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आला आणि त्याचा शाकिबला राग आला. सुरुवातीला त्याने नकार दिला आणि नंतर चाहत्याने सेल्फीसाठी आग्रह केल्यावर त्याने त्याचा फोन खेचून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीच्या गळ्याला पकडून त्याला जवळपास मारहाण केली आणि त्याला तिथून जाण्यास भाग पाडले.
२ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. यासाठी एकीकडे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत स्टेडियम तयार होत असताना दुसरीकडे आयसीसीचीही तयारी सुरू आहे. दरम्यान, विविध मालिका खेळून संघही आपली तयारी मजबूत करत आहेत. आत्तापर्यंत बहुतांश संघांनी टी-२० विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले आहेत, परंतु ज्या संघांची घोषणा करण्यात आली नाही. त्यात बांगलादेशचाही समावेश आहे. दरम्यान, आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी बांगलादेशचा संघ झिम्बाब्वे विरूद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.