करोनाच्या तडाख्यामुळे सध्या दहशतीचे वातावरण आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाउन आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. दर थोड्या वेळाने नकारात्मक बातम्या कानावर पडत आहेत, पण असे असताना त्यातच एक सकारात्मक बातमी आली आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने तो बाबा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन आणि त्याची पत्नी यांना कन्याप्राप्ती झाली असून त्याने याबाबत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा दोन्ही माध्यमातून बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. रमजानच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २४ तारखेला त्याच्या घरी ‘नन्ही परी’ने जन्म घेतला. शाकीबने आज याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली. शकिबनं त्याच्या मुलीचे नाव इरम असं ठेवलं आहे. त्याच्या पहिल्या मुलीचे नाव अलायना औब्रे हसन असे आहे.

शकिब आणि त्याची पत्नी शिशीर यांची लंडनमध्ये २०१० साली भेट झाली. शाकीब कौंटी क्रिकेट खेळत असताना शिशीर लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. २०१५ मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर आठवड्याभरापूर्वी शिशीरने दुसऱ्या गोंडस मुलीला जन्म दिला. शाकीबने इरमचा जन्म दाखलादेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सध्या शाकीब क्रिकेट बंदीची शिक्षा भोगत आहे. शाकिब अल हसन याच्यावर ICC ने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. एकदिवसीय, टी २० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले नियमभंगाचे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावरील बंदीची कारवाई एका वर्षाची (back dated suspension) करण्यात आली असून तो २९ ऑक्टोबर २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकणार आहे.