Shakib Al Hasan Announces Retirement from T20 and Test: बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी त्याने ही घोषणा केली. या दोन्ही देशांमधील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शाकिबने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.

भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिबने घोषणा करत सांगितले की, तो या वर्षी मीरपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याबरोबरच, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
25th September Rashi Bhavishya & Panchang
२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य: ग्रहमानाच्या साथीने दिवस…
Govandi honour-killing case
Govandi honour-killing case: हिंदू मुलाशी मुस्लीम मुलीने लग्न केल्यामुळे दोघांचे ऑनर किलिंग; चार अल्पवयीन आरोपींवर प्रौढ म्हणून खटला चालणार
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
Tumbbad Moive Sardar Purandare Wada History and Significance in Marathi
Tumbbad Sardar Purandare Wada: तुंबाड चित्रपटातील ‘तो’ चित्तथरारक वाडा नेमका आहे कुठे? त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय?
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
pager blast lebanon reuters
Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

हेही वाचा – VIDEO: युवराज सिंगला गर्लफ्रेंड अभिनेत्रीच्या गुलाबी ‘स्लिप-ऑन्स’ घालून जावं लागलं एअरपोर्टवर, ‘तिचं’ नाव सांगण्यास दिला नकार

शाकिब अल हसनने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. म्हणजेच टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. तो म्हणाला की मी माझा शेवटचा टी-२० सामना खेळला आहे आणि मी माझ्या टी-२० कारकिर्दीबद्दल क्रिकेट बोर्डाशी बोललो आहे आणि T20 World Cup २०२६ लक्षात घेऊन, आता पुढे जाण्यासाठी योग्य वेळ असेल.

कानपूरमधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूर येथे होणारा कसोटी सामना असेल, “मी मीरपूरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळू इच्छितो, पण तसे झाले नाही तर भारताविरुद्धची ही कसोटी माझा शेवटचा कसोटी सामना असू शकतो.”

हेही वाचा – IPL Player Auctions: BCCI आयपीएल लिलावासाठी बदलणार मोठा नियम, मुंबई इंडियन्सला होणार तगडा फायदा

शकिब अल हसन टी-२० आणि कसोटी कारकिर्द

शाकिब अल हसनने बांगलादेशसाठी आतापर्यंत ७० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५ शतकांच्या मदतीने ४६०० धावा केल्या आहेत, तर सर्वोत्तम धावसंख्या २१७ धावा आहे, तर १२९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २५५१ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. ८४ धावा केल्या आहेत. शाकिब अल हसनने आतापर्यंत ७० कसोटी सामन्यात २४२ विकेट्स घेतल्या आहेत तर १२९ सामन्यात १४९ विकेट घेतले आहेत.