Asia Cup 2023, Bangladesh Captain: आशिया चषक २०२३ची सुरुवात ३० ऑगस्टपासून होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. एखाद्या दिग्गज खेळाडूला एकदिवसीय संघाची कमान दिली जाणार आहे, ज्याने ही जबाबदारी आधीच पार पाडली आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये ‘या’ खेळाडूची गणना होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आशिया चषकापूर्वी संघाला नवा कर्णधार मिळणार
आशिया चषक स्पर्धेला सुरुवात व्हायला फारच कमी कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा दिग्गज फलंदाज तमीम इक्बालने वन डे संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो आशिया कपमधून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. तमीम इक्बालने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काही तासांतच निवृत्तीचा निर्णय घेतला.
‘या’ खेळाडूला मिळणार जबाबदारी
स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनला बांगलादेशच्या वन डे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे अध्यक्ष नझमुल हसन यांनी देखील तमीम इक्बाल पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर आगामी आशिया चषक २०२३ मध्ये एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी शाकिब अल हसन हा आपला पसंतीचा उमेदवार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. शाकिबने सध्या कसोटी आणि टी२० संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, त्याने यापूर्वी २०११च्या विश्वचषकासह ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले होते.
बीसीबी अध्यक्षांनी ही माहिती दिली
नझमुल हसनने शनिवारी ५ ऑगस्ट रोजी ढाका येथे पत्रकारांना सांगितले की, “आम्ही कर्णधारपदावर चर्चा करत आहोत. मात्र, आम्हाला थोडा ब्रेक हवा आहे आणि आम्ही त्याबद्दल विचार करत आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे, जर ही मालिका असती तर आम्ही उपकर्णधार म्हणून लिटनसोबत जाऊ शकलो असतो, परंतु आता आम्हाला दीर्घकालीन विचार करावा लागेल.”
ते म्हणाले की, “दोन समस्या आहेत. जर आपण दीर्घकालीन विचार केला तर ती एक गोष्ट आहे. पण विश्वचषकही आहे आणि विश्वचषकाचे दडपणही कमी नसते. जर मी एखाद्या नवीन माणसाची निवड केली आणि तो दबाव हाताळू शकला नाही तर..हाही आपण विचार केला पाहिजे. जर आपण एखाद्याला दीर्घ कालावधीसाठी निवडले आणि तो एक वर्षानंतर उपलब्ध नसेल तर आपण काय करू पुढे? त्यामुळे या गोष्टींवर चर्चा करायला हवी.”
नझमुल पुढे म्हणाले की, “शाकिबची निवड स्पष्ट आहे पण तो दोन वर्षे खेळेल असे तुम्ही म्हणू शकता का? आम्हाला ते माहित नाही आणि म्हणून आम्हाला त्यांची योजना जाणून घेणे आणि बोर्डाशी बोलणे आवश्यक आहे. मला वाटते की सर्वात सोपा पर्याय शाकिब आहे आणि त्यात कोणतीही अडचण नाही. द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवणे आणि विश्वचषक जिंकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा लिटन दासच्या फलंदाजीवर परिणाम होतो की नाही, हे सर्व पाहावे लागेल. आम्ही घिसाडघाईने निर्णय घेणार नाही.”