Shakib Al Hasan on BPL: बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने बांगलादेश क्रिकेट बोर्डावर (बीसीबी) टीका केली आहे. बीसीबीला बांगलादेश प्रीमियर लीगचे (बीपीएल) योग्य मार्केटिंग करता आलेले नाही, असे शाकिबचे मत आहे. यादरम्यान शकीब अनिल कपूरच्या प्रसिद्ध चित्रपट नायकचाही उल्लेख केला. खरे तर नायकमध्ये अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री होऊन राज्यातून भ्रष्टाचार संपवल्याचे दाखवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाकिबने पत्रकारांना सांगितले की, “जर त्यांनी मला बीपीएलचे सीईओ बनवले, तर मला सर्व काही सुरळीत करण्यासाठी एक किंवा दोन महिने लागतील. तुम्ही ‘नायक’ चित्रपट पाहिला आहे का? जर तुम्हाला काही करायचे असेल तर तुम्ही ते एका दिवसात करू शकता.”

तो पुढे म्हणाला, “मी प्लेअर ड्राफ्ट आणि लिलाव (वेळेवर) करेन आणि मोकळ्या वेळेत बीपीएल आयोजित करेन. आपल्याकडे सर्व आधुनिक तंत्रज्ञान असेल. देशांतर्गत आणि परदेशी देशांसाठी चांगले प्रसारक असतील.”

हेही वाचा – IND vs SL T20 Series: टीम इंडियात संजू सॅमसनची जागा घेणारा कोण आहे जितेश शर्मा? घ्या जाणून

बीपीएल, बांगलादेश क्रिकेट बोर्डची स्थानिक टी-२० लीग, २०२१२ मध्ये सहा फ्रँचायझी संघांसह सुरू करण्यात आली होती. आता संघांची संख्या सात झाली आहे. बीपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा शाकिबने दावा केला की बीसीबीने ही स्पर्धा लोकप्रिय करण्याचा कोणताही हेतू दाखवला नाही. तो म्हणाला, “मला बीपीएल स्थितीबद्दल माहिती नाही. आपण ते यशस्वी करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही हे सांगणे कठीण आहे.”