Bangladesh squad announced for Asia Cup 2023: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये खेळवली जाणार आहे. तत्पुर्वी बीसीबीने शाकिब अल हसनला वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. तो आशिया चषक आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचे नेतृत्व करेल.

शाकिब अल हसनपूर्वी तमिम इक्बालला वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तो दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडलाआहे. तमिमने यापूर्वी ६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीनंतर त्याने आपला निर्णय बदलला होता.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
maharashtra vidhan sabha election 2024 hasan mushrif vs samarjit ghatge
लक्षवेधी लढत : मुश्रीफ- घाटगेंमध्ये पुन्हा लढत फक्त पक्ष बदलून
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले, “तमिमच्या निवृत्तीनंतर बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी शाकिबला पहिली पसंती होती. आशिया चषक आणि विश्वचषक यांसारख्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत असताना त्याची उत्कृष्ट कामगिरी, अनुभव आणि नेतृत्वगुण संघाला प्रेरणा देतील याची मला खात्री आहे.”

हेही वाचा – IND vs WI 4th T20 : शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडण्यास युजवेंद्र चहल सज्ज, वेस्ट इंडिजविरुद्ध करावा लागणार ‘हा’ पराक्रम

गेल्या वर्षी कसोटी आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शकीब आता तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार आहे. ३६ वर्षीय खेळाडूने यापूर्वी २००९ ते २०१७ दरम्यान बांगलादेशचे ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, ज्यात २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने २३ एकदिवसीय सामने जिंकले, तर २६ वेळा पराभव पत्करावा लागला. भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणारा पुरुष एकदिवसीय विश्वचषक हे संघापुढील सर्वात मोठे आव्हान असेल. जिथे बांगलादेश ७ ऑक्टोबरला धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

आशिया चषक २०२३ साठी बांगलादेश संघ: शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झीद हसन तमीम, नझमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन ममुद, महेदी हसन, नाझम हसन, ना. शमीम हुसेन, अफिफ हुसेन, शोरफुल इस्लाम, अबदोत हुसेन, मोहम्मद नईम