Shakib Al Hasan suspended from bowling in ECB competitions: बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शकिब अल हसन कायमच विविध वादांमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आता सध्या नवा वाद समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप्टेंबरमध्ये शाकिब अल हसन काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये सरेकडून खेळत असताना पंचांनी त्याच्या गोलंदाजीच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. या सामन्यात शाकिब अल हसनने ९ विकेट घेतल्या. २०१०-११ नंतर काऊंटी क्रिकेटमधला हा त्याचा पहिला सामना होता. या महिन्याच्या सुरुवातीला लॉफबरो विद्यापीठातील चाचण्यांमध्ये त्याची गोलंदाजीची अॅक्शन बेकायदेशीर आढळल्यानंतर त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघात २ मोठे बदल; हर्षित राणा-अश्विन…

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, ‘निलंबन अधिकृतपणे १० डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहे. त्याच तारखेला ECB ला लॉफबरो विद्यापीठाकडून मूल्यांकनाचे निकाल प्राप्त झाले. शकिब हा बांगलादेश संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच कसोटी आणि टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घातलेली ही बंदी उठवण्यासाठी शकिबला आता त्याच्या गोलंदाजी अॅक्शनची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. या चाचणीत गोलंदाजी करताना त्याचं कोपर १५ अंशांपेक्षा कमी वाकलं पाहिजे. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच तो इंग्लंडच्या देशांतर्गत स्पर्धेत गोलंदाजी करू शकेल.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

शाकिब अल हसन अलीकडच्या काळात अनेक वादात सापडला आहे. बांगलादेशामध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला बांगलादेशमध्ये जाता आलेले नाही. त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो बांगलादेशकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे अध्यक्ष फारुख अहमद यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की शकीब हा ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघाच्या योजनांचा एक भाग आहे. “देशाबाहेर राहून बांगलादेशकडून खेळणं शकिबसाठी निश्चितच आव्हान आहे. सध्या तो पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमच्या रणनीतीचा एक भाग आहे.”

शकिबने ७१ कसोटीत ४६०९ धावा केल्या आणि २४६ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर २४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७५७० धावा आणि ३१७ विकेट आहेत. त्याने बांगलादेशसाठी १२९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५५१ धावा आणि १४९ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakib al hasan suspended from bowling in ecb competitions following an independent assessment of his bowling action bdg