Shamar Joseph Six Broke Stadium Roof Video Viral : इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या दमदार गोलंदाजीने घाम फोडला. यानंतर पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजाचे शानदार धुलाई केली. तिसऱ्या दिवसातील डावाच्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने शमर जोसेफनेअसा शॉट खेळला ज्यामुळे स्टेडियमधील प्रेक्षक गॅलरीचे छत तुटले आणि प्रेक्षक थोडक्यात बचावले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शमर जोसेफची तुफानी खेळी –
शमर जोसेफने इंग्लंडविरुद्ध तुफानी खेळी खेळली. त्याने २७ चेंडूत ३३ धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. गस ऍटकिन्सन डावातील १०७ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील तिसरा आणि चौथा चेंडू हा शॉट पिच बॉल होता. ज्यावर शामर जोसेफने एक शक्तिशाली शॉट खेळला जो स्टेडियमधील प्रेक्षक गॅलरीच्या छतावर जाऊन आदळला. ज्यामुळे छताचा काही भाग तुटला आणि प्रेक्षकांच्या अंगावर पडला. त्यामुळे काही प्रेक्षक दुखापत होण्यापासून थोडक्यात वाचले. कारण यावेळी सर्वजण सतर्क असल्याने कोणालाही फारशी दुखापत झाली नाही.
१०व्या विकेटसाठी मोठी भागीदारी करत रचला विक्रम –
वेस्ट इंडिजसाठी जोशुआ डी सिल्वा आणि शमर जोसेफ यांनी १०व्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजची १०व्या विकेटसाठीची ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून १०व्या विकेटसाठी ही पाचवी सर्वोच्च भागीदारी आहे. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी वेस्ट इंडिजने २०१४ मध्ये केन्सिंग्टन ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध ४५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
हेही वाचा – Hardik Pandya : घटस्फोट आणि कर्णधारपदाच्या हुलकावणीनंतर हार्दिकची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कधीकधी मन…’
इंग्लंडच्या ४१६ धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ ८४ धावांत तीन विकेट गमावून अडचणीत सापडला होता, मात्र ॲलेक अथानासे आणि केव्हिन हॉजच यांच्या १७५ धावांच्या भागीदारीने संघाला संकटातून बाहेर काढले. या डावातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हॉजचे शतक, ज्याने १७१ चेंडूत १२० धावा केल्या. यानंतर जेसन होल्डर लवकर बाद झाला. अल्झारी जोसेफला ख्रिस वोक्सने बाद केले.
हेही वाचा – Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
यानंतर जोशुआ डी सिल्वाने उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने अनेक शानदार फटके खेळले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. ११व्या क्रमांकाचा फलंदाज शमर जोसेफनेही दमदार खेळी केली. जोशुआने १२२ चेंडूत ८२ धावांची खेळी खेळली आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. शमर जोसेफने २७ चेंडूत झटपट ३३ धावा केल्या. ज्यामुळे वेस्ट इंडिजला ४५७ धावा करत आल्या. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४७ धावांची आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून तिसऱ्या दिवस अखेर ३ बाद २४८ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक ७१ आणि जो रुट ३७ धावांवर नाबाद आहेत.