West Indies to defeat Australia by 8 runs in the Gabba Test match : कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामन्यात पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोर मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. वेस्ट इंडिजकडून शामर जोसेफने शानदार गोलंदाजी केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर तो प्रसिद्ध झाला आहे. जोसेफला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे एकाच वेळी दोन पुरस्कार मिळाले. त्याची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.
ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवण्यात आलेला सामना वेस्ट इंडिजने ८ धावांनी जिंकला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात जोसेफने ७ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात एक विकेटही घेतली. शमर जोसेफने या मालिकेतील दोन सामन्यात एकूण १३ विकेट्स घेतल्या. मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जोसेफ दुसऱ्या स्थानावर राहिला. जोश हेझलवूडने १४ विकेट्स घेतल्या. जोसेफला त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दुसऱ्या सामन्यात दुखापत होऊनही त्याने शानदार गोलंदाजी केली आणि तो ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे कारण ठरला.
कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला होता. यानंतर संघाने दुसरा सामना ८ धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या. यानंतर संघ दुसऱ्या डावात १९३ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ विकेट गमावून २८९ धावा करून घोषित केला. यानंतर संघाला दुसऱ्या डावात केवळ २०७ धावा करता आल्या. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला.
हेही वाचा – U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
गाबा मैदान हा ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य किल्ला मानला जातो. मात्र, २०२१ मध्ये भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर आता वेस्ट इंडिजनेही अशीच कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे १९८८ पासून ऑस्ट्रेलियाने या मैदानावर फक्त तिसरीच कसोटी गमावली आहे. १९८८ मध्ये वेस्ट इंडिजने पराभव केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर आता २०२४ मध्ये वेस्ट इंडिजने पराभव केला आहे.