वेस्ट इंडिज तिरंगी मालिका
वेस्ट इंडिज मध्ये २८ जून पासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका-वेस्टइंडिज तिरंगी मालिकेसाठीच्या पंधरा सदस्यीय भारतीय संघात बंगालच्या शामी अहमद या गतीमान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) याआधीच चॅम्पियन्स करंडक मालिकेसाठीचाच संघ वेस्ट इंडिज तिरंगी मालिकेसाठीही कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, अखेरीस बीसीसीआयने त्यात बदल केला आहे. इरफान पठाण दुखापतग्रस्त असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शामी अहमद आणि विनय कुमार या पाच गतीमान गोलंदाजांचा समावेश आहे. तर, फिरकी गोलंदाजी सांभाळण्यासाठी आर.अश्विन, रविंद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांचा समावेश करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेसाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी(कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहीत शर्मा, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, शामी अहमद, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, अमित मिक्षा, विनय कुमार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा