भारताच्या सी. शामशुद्दीन यांना आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आंतरराष्ट्रीय पंचांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ४२ वर्षीय शामशुद्दीन यांनी नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पदार्पण केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यातही ते पंच म्हणून कार्यरत होते.
शामशुद्दीन यांच्यासह चार पंचांचा आंतरराष्ट्रीय पंचांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांगलादेशचे अनिसुर रहमान, इंग्लंडचे मायकेल गॉग आणि टीम रॉबिन्सन आणि न्यूझीलंडचे डेरेक वॉकर यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त भारतीय वंशाच्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या समीर बांदेकर यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत स्थान मिळवण्यासाठी संबंधित बोर्डाची शिफारस असणे आवश्यक असते.
शामशुद्दीन आयसीसी पंच यादीत
भारताच्या सी. शामशुद्दीन यांना आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आंतरराष्ट्रीय पंचांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ४२ वर्षीय शामशुद्दीन यांनी नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पदार्पण केले होते.
First published on: 04-01-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamshuddin in icc international panel of umpires