क्रिकेटचा सामना सुरू असताना कधी कधी अशा काही घटना घडतात की आपल्याला चकित करतात. अशीच एक घटना टी-२० ब्लास्ट टूर्नामेंटमध्ये घडली आहे. त्याच चेंडूवर पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदची एकाच चेंडूवर हिट विकेट धावबादही झाला. पण बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला नाही. हे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. पण शान मसूदला पंचांनी बाद का दिले नाही? यामागचं कारण काय आहे, जाणून घ्या.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान

पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद टी-२० ब्लास्टमध्ये यॉर्कशायरकडून खेळत आहे. २० जून रोजी त्याच्या संघाचा सामना लँकेशायरशी झाला. या सामन्यात शानने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. तो ३६ चेंडूत ५८ धावा करत खेळत होता. त्यानंतर जॅक ब्लॅदरविकच्या चेंडू स्कूप करण्याचा त्याने प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याच्या पायाचा विकेटला स्पर्श झाला. मात्र त्यानंतर अंपायरने नो बॉलचा इशारा दिला. पण स्वत:ला आऊट समजून त्याने क्रीज सोडली आणि लँकेशायरच्या क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केले.

नो बॉलमुळे शान मसूद हिट विकेट होण्यापासून वाचला पण नंतर तो रनआउट झाला. मात्र, त्यानंतरही तो पॅव्हेलियनमध्ये परतला नाही. क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज नो बॉलवर धावबाद होऊ शकतो. पण इथे आयसीसीच्या नियम ३७.१ ने शान मसूदला वाचवले. शान मसूदने आउट झाल्याचे समजत त्याने क्रीज सोडली. तो धाव काढत नव्हता आणि याच कारणामुळे पंचांनी त्याला पॅव्हेलियनमध्ये परत जाऊ दिले नाही.

हेही वाचा – IND v AFG: सूर्यकुमारचं नाव विसरला पत्रकार, वेगळ्याच नावाने हाक मारताच सूर्या म्हणाला; “अरे सिराज भाई तो…”; VIDEO व्हायरल

आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार (कायदा ३१.७), जर फलंदाजाने आपण आऊट आहोत असा विचार करून क्रीज सोडली, तर यादरम्यान फलंदाजाला रनआउट दिले जात नाही. यामुळेच पंचांनी मसूदला धावबाद घोषित केले नाही. त्याचवेळी अंपायरनेही हा चेंडू डेड बॉल घोषित केला होता.

हेही वाचा – IND v AFG: “मी च्युइंग गम जोरात…” विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार घाबरला होता? अर्धशतकी खेळीनंतर पाहा काय म्हणाला

शान मसूदला नाबाद घोषित केल्याचा निर्णय देण्यात आला तेव्हा लँकेशायरच्या खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. असा नियम आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. विरोधी संघाचे खेळाडूही पंचांकडून नियम समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. या सामन्यात शान मसूदने ६१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या सामन्यात यॉर्कशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट गमावत १७३ धावा केल्या, त्यानंतर लँकेशायर संघ केवळ १६६ धावा करू शकला आणि यॉर्कशायर संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.