Shane Bond has resigned as bowling coach of MI: सध्या संपूर्ण जग क्रिकेट विश्वचषकाच्या जल्लोषात बुडाले आहे. चाहत्यांसाठी दररोज काही ना काही धमाकेदार पाहिला मिळत आहे. पण या सगळ्यात आयपीएल टीम मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. मुंबईच्या माजी दिग्गज खेळाडूने संघाला निरोप दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२३ पूर्वी मुंबई संघासाठी हा मोठा धक्का आहे. मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड मुंबई संघातून बाहेर झाले आहेत. याबाबत मुंबई इंडियन्सने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंडचा माजी स्टार वेगवान गोलंदाज शेन बाँड, जो गेली नऊ वर्षे मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. त्याने या आयपीएल संघापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. बाँड २०१५ मध्ये मुंबई संघात सामील झाला आणि संघाने त्याच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली चार आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. मुंबई इंडियन्स एमिरेट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचाही त्यानी राजीनामा दिला आहे.

मुंबई इंडियन्स संघात गोलंदाज घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली –

शेन बाँड हा न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. २०१५ पासून तो मुंबई संघाचा भाग होता. बाँडने मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेते बनवले. शेन बाँडने मुंबई इंडियन्स संघात गोलंदाजी घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शेन बाँड हे इंटरनॅशनल लीग टी-२० च्या उद्घाटन हंगामात एमआय एमिरेट्सचे मुख्य प्रशिक्षक देखील होते, परंतु आता त्यांनी मुंबई इंडियन्सपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – World Cup 2023: बेन स्टोक्स दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार का? जाणून घ्या इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाचे उत्तर

बाँडने एका निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या नऊ सीझनमध्ये मुंबई इंडियन्स कुटुंबाचा भाग असल्याबद्दल मी अंबानी कुटुंबाचे आभार मानतो. हा एक उत्तम अनुभव होता आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चांगल्या आठवणी होत्या.” तो पुढे म्हणाला, “अशा महान व्यक्ती, खेळाडू आणि कर्मचारी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मला त्या सर्वांची उणीव भासेल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

मुंबईने या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. तो मुंबईकडूनही खेळला आहे. न्यूझीलंडकडून १८ कसोटी, ८२ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळलेल्या बाँडने मुंबई इंडियन्सच्या युवा गोलंदाजांना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.