जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे आज वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट जगातीशी निगडीत असलेल्या तसेच अन्य क्षेत्रांमधील व्यक्तींनी देखील शेन वॉर्नच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नने आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धावर काही दिवसांअगोदरच प्रतिक्रिया दिली होती.
दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन
शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे सांगितले होते.
Shane Warne Died : शेन वॉर्नचं ‘ते’ ट्वीट ठरलं शेवटचं ; ‘या’ खेळाडूबद्दल व्यक्त केल्या होत्या भावना
शेन वॉर्नने लिहिले होते की, “संपूर्ण जग युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी आहे कारण ते रशियन सैन्याने केलेल्या विनाकारण आणि अन्यायकार हल्ल्याला सामोरे जात आहेत . दृश्य भयावह आहेत आणि मला विश्वास बसत नाही की हे थांबवण्यासाठी आणखी काहीही केले जात नाही. माझे युक्रेनियन मित्र अँड्री शेवचेन्को यास आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप प्रेम.” अशा शब्दांमध्ये शेन वॉर्नने प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आली आहे.