ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे ४ मार्च २०२२ रोजी निधन झाल्यानंतर जगभरातील क्रिकेट चाहते हळहळले. दरम्यान आज ३० मार्च रोजी शेन वॉर्नवर ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये अंतिम निरोप देण्यात आला. या वेळी मैदानात राजस्थान रॉयल्सचा झेंडा फडकत होता. तर दुसरीकडे वडिलांना श्रद्धांजली देताना वॉर्नची मुलगी जॅकसनला रडू कोसळले. यावेळी क्रिकेट क्षेत्रातील बड्या व्यक्ती तसेच वॉर्नचे जगभरातील चाहते उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑफ स्पिनर शेन वॉर्नचे चार मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. वॉर्नला आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. आल. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तसेच क्रिकेट जगतातील ब्रायल लारा, मार्क टेलर, एलन बॉर्डर, नासिर हुसेन यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. त्यांनी शेन वॉर्नसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी फक्त क्रिकेट क्षेत्रातीलच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील मोठे चेहरे तसेच राजकीय व्यक्ती उपस्थित होते. गीतकर काइली मिनोग आणि अभिनेता ह्यू जॅकमन तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनदेखील उपस्थित होते. यावेळी क्रिकेटपटू तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी वॉर्नच्या आठवणी सांगितल्या. तसेच वडिलांना अखेरचा निरोप देताना वॉर्नची मुलगी समर जॅकसनला रडू कोसळले.

यावेळी मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सचा झेंडा मेलबर्न क्रिकेट स्टेडिममध्ये फडकत होता. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद शेन वॉर्नकडे होते. या हंगामात वॉर्नच्या नेतृत्वाखालीच राजस्थानने जेतपद पटकावले होते. याची आठवण म्हणून मेलबर्न स्टेडियमवर झेंडा लावण्यात आला होता.

Story img Loader