ऑस्ट्रेलियाच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्न यापूर्वी अनेकदा वादात सापडला होता. कधी मद्यपान करून आणि ड्रग्ज घेऊन, तर कधी मुलींना घाणेरडे मेसेज पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. आता टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या जेसिका पॉवरने शेन वॉर्नकडून आलेल्या त्या मेसेजबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नला विक्षिप्त उपमा देत जेसिका म्हणाली, ”त्याने मला अश्लील मेसेज पाठवले होते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेसिका पॉवरने सांगितले, ”मी वॉर्नला प्रत्युत्तर दिले. तेव्हा तो’एक्स-रेटेड’ झाला. त्यामुळेच वॉर्न बहुतेक वेळा अडचणीत येतो.” जेसिकाने वॉर्नला वेडा म्हटले. तिने सांगितले, की जेव्हा तिला असे मेसेज आले तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता, की ५२ वर्षीय माजी क्रिकेटपटू असे कृत्य करू शकतो आणि असे घाणेरडे मेसेज तिला पाठवू शकतो.

ती म्हणाली, ”हे आणखी विचित्र होते, की सलग दुसऱ्या आठवड्यात माझ्या इनबॉक्समध्ये शेन वॉर्नचे मेसेज आले होते. तो एक विक्षिप्त आहे. त्याने मला पाठवलेल्या काही गोष्टी योग्य नव्हत्या. मी त्याला क्वचितच उत्तर दिले. याच कारणांमुळे तो सतत अडचणीत येतो.”

हेही वाचा – “हरभजनची माफी माग, संबंध नसताना…”, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं ‘त्या’ प्रकरणी मोहम्मद आमिरला खडसावलं!

शेन वॉर्न हा क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. १५ वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत, या दिग्गज लेग-स्पिनने १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर ७०८ विकेट्स आहेत. वॉर्नने २००७ साली ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.