ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला १९ जुलै रोजी ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात येणार आहे. लॉर्ड्सवर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चहापानादरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याचे आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे. २०१२-१३ या वर्षांत हा मान मिळवणाऱ्या ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), ईनिड बेकवेल (इंग्लंड) आणि ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) यांच्या पंक्तीत तो सामील झाला आहे. ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये सहभागी झालेला ६९वा क्रिकेटपटू आहे. वॉर्नने १९९२ ते २००७ या कालखंडात १४५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २५.४१च्या सरासरीने ७०८ कसोटी बळी घेतले आहेत. सातशे कसोटी बळी घेणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय त्याने १९४ एकदिवसीय सामन्यांत २५.७३च्या सरासरीने २९३ बळी घेतले आहेत.
आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला १९ जुलै रोजी ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
First published on: 11-07-2013 at 08:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne to join iccs hall of fame