ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने, स्थानिक बिग बॅश लीग स्पर्धेमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटसन बिग बॅश लिगमध्ये सिडनी थंडर संघाचा कर्णधार होता. मात्र आपल्या परिवारासोबत वेळ घालवता यावा यासाठी आपण निवृत्ती घेत असल्याचं वॉटसनने जाहीर केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३७ वर्षीय वॉटसनने सलग ४ वर्ष सिडनी थंडर संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यावेळी वॉटसनने सिडनी थंडरच्या संघ प्रशासनाचे आभार मानले. सिडनी थंडरकडून शेन वॉटसनने सर्वाधिक १ हजार १४ धावा करण्याचा बहुमान मिळवला आहे. याव्यतिरीक्त वॉटसनच्या नावावर १९ बळीही जमा आहेत. सध्या वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane watson bids adieu to big bash league