भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेची चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत आणि अगदी खेळाडूंनाही उत्सुकता आहे. मालिकेपूर्वी दोन्ही देशांचे दिग्गज खेळाडू आपापल्या संघांना टिप्स देत आहेत, ज्या आगामी मालिकेत खेळाडूंसाठी उपयुक्त ठरू शकतात.
भारताविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये रवींद्र जडेजाचा सामना करताना, ऑस्ट्रेलियन उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणी येऊ शकतात. अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने दिली आहे. वॉटसनचे म्हणने आहे की, जडेजा नेहमी यष्टींवर हल्ला करतो. उजव्या हाताच्या फलंदाजांना त्याचा सामना करणे कठीण होते.
ऑस्ट्रेलियाच्या संघात मार्नस लांबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ आहेत. शेवटच्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा स्टीव्ह स्मिथ या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. वॉटसनने ऑस्ट्रेलियाच्या उजव्या हाताच्या फलंदाजांना केवळ टिकून राहून खेळू नका, तर जडेजाविरुद्ध धावा करण्याचाही प्रयत्न करा, असा सल्ला दिला आहे. तो म्हणाला डाव्या हाताच्या स्पिनरला सूर सापडू देऊ नका.
वॉटसनने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, “जेव्हा चेंडू वळत असतो आणि जेव्हा चेंडू वळत नसतो, तेव्हा त्यांचा सामना करणे वेगळे असते. जेव्हा चेंडू वळत असतो तेव्हा असे वाटते की आपण वेगळ्या गोलंदाजाचा सामना करत आहोत. कारण तो नेहमीच चापलूस, वेगवान आणि अधिक सुसंगत असतो. तो नेहमी यष्टीवर गोलंदाजी करतो.”
तो पुढे म्हणाला, “एक चेंडू वळेल आणि दुसरा स्किड होईल आणि सरळ राहील. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून त्याचे काम पार पाडणे कठीण आहे. असा मार्ग शोधणे की गरजेचे आहे, केवळ टिकून न राहता, धावादेखील करत राहू शकता.”
शेन म्हणाला, “ऑस्ट्रेलियाकडे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्या रूपाने चांगले फिरकी फलंदाज आहेत. त्यांच्याकडे डावखुरे फलंदाजही आहेत. जर माझी पुन्हा वेळ आली, तर मी जडेजाला सरळ बॅटने खेळलो असतो.”