‘‘लोकशाही प्रक्रियेत कोणीही कोणाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो. यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे विरोधात उभे ठाकले तरी काहीही परिणाम होणार नाही. शेवटी शरद पवार हेच निवडून येतील,’’ असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणिकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘‘शरद पवार यांनी आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीए या महत्त्वाच्या संघटनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन-चार दिवसांपूर्वी एखाद्या क्लबचे सदस्यत्व मिळवून पवार हे निवडणूक लढवीत नाहीत,’’ असा टोला पटेल यांनी मुंडे यांना उद्देशून मारला. ‘‘निवडणुकीच्या रिंगणात कोणीही उतरो वा कितीही लढत देवो, शेवटी विजय हा पवार यांचाच होईल,’’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

Story img Loader