भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा पुण्यात सन्मान करण्यात आला. एजल फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण चंदू बोर्डे यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शरद पवार हे बोलत होते.दरम्यान शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी पवारांनी आयपीएलबाबत ललित मोदी यांचं कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आयपीएल सुरु करण्यात ललित मोदींचा हातभार आहे. आयपीएलच्या निर्मितीत त्यांनी खूप कष्ट घेतले. भारताने जगाला दिलेला एक देखणा आणि आपण सुरु केलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटच सगळं अर्थकारणच बदलून गेलं आहे. जगातील उत्तम खेळाडू आपल्या इथं खेळण्यासाठी येऊ लागले. यातून नव्या पिढीला त्यांच्या बरोबर खेळण्याची संधी मिळाली.”, अशा शब्दात शरद पवार यांनी ललित मोदींचं कौतुक केलं.

कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी ललित मोदी यांच्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. “मी ललित मोदींच कौतुक केलं. कारण आयपीएल सुरू करण्यात योगदान आहे. बाकी काही नाही.”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

काय आहेत ललित मोदींवर आरोप?
आयपीएलमध्ये ललित मोदींनी मनमानीपणे कार्यभार केल्याचा आरोप आहे. तसेच बीसीसीआयचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठफका आहे. सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी आढळून आले आहेत. बीसीसीआयने ललित मोदींवर आजीवन बंदी घातली आहे.