क्रिकेटमध्ये सर्वोच्च समजले जाणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवल्यानंतरभारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीसाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. मात्र एमसीएची निवडणूक लढवण्यासाठी मुंबईचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच पवार यांनी मुंबईतील मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करावा, असा अर्ज मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे. गेली ३५ वर्षे पवारांचे नाव बारामतीच्या मतदार यादीत आहे.
२०११ मध्ये एमसीएची निवडणूक झाली तेव्हा ते बारामतीचे रहिवासी होते. त्यामुळे त्यांना ती निवडणूक लढवता आली नव्हती. त्या वेळी त्यांनी आपल्या संघाचा ‘कप्तान’ म्हणून विलासराव देशमुख यांना पाठिंबा दिला होता, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) शरद पवार यांना पुन्हा डाव सुरू करायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा एमसीएमध्ये निवडून येणे भाग आहे. त्यासाठीच त्यांनी बारामती मतदार यादीतून आपले नाव कमी करून मलबार हिल मधून मतदार यादीत समावेश होण्यासाठी अर्ज केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात एमसीएची निवडणूक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा