माजी विजेती मारिया शारापोवा, डेव्हिड फेरर व निकोलस अल्माग्रो यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच राखली. या स्पर्धेत २००८ मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या शारापोवा हिने बेल्जियमच्या किर्स्टन फ्लिपकेन्सचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना तिने आतापर्यंत केवळ पाच गेम्स गमावल्या आहेत. हा स्पर्धेतील विक्रम आहे. यापूर्वी मोनिका सेलेस (१९९१ व १९९२) व स्टेफी ग्राफ (१९८९) यांनी या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना आठ गेम्स गमावल्या होत्या. तिचीच सहकारी एकतेरिना मकारोवा या १९ व्या मानांकित खेळाडूने जागतिक क्रमवारीतील पाचवी मानांकित खेळाडू अँजेलिना क्रेबर (जर्मनी) हिच्यावर ७-५, ६-४ असा सनसनाटी विजय नोंदविला.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत डेव्हिड फेरर व निकोलस अल्माग्रो यांच्यात सामना होईल. फेरर याने जपानच्या केई निशिकोरी याचे आव्हान ६-२, ६-१, ६-४ असे सरळ तीन सेट्समध्ये संपुष्टात आणले. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत हा सामना सव्वा दोन तासांत जिंकला. निशिकोरी याला दहावे मानांकन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दहावा मानांकित अल्माग्रो याच्याविरुद्धच्या सामन्यात यान्को तिप्सेरेव्हिक याने पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतली. त्यावेळी अल्माग्रो याच्याकडे ६-२, ५-१ अशी आघाडी होती.
चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीच यानेही अपराजित्व कायम राखले. त्याने चुरशीच्या लढतीनंतर केविन अँडरसन याच्यावर मात केली. हा सामना त्याने ६-३, ६-२, ७-६ (१५-१३) असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये अतिशय चिवट खेळ पाहावयास मिळाला. दोन्ही खेळाडूंनी परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला.
मिश्र दुहेरीत भूपती-नादिया दुसऱ्या फेरीत
मेलबर्न :  भारताच्या महेश भूपती याने नादिया पेट्रोवा हिच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या इंडो-रशियन जोडीने अ‍ॅनास्ताशिया रोदिओनोवा (ऑस्ट्रेलिया) व जीन ज्युलियन रॉजेर (नेदरलँड्स) यांना ६-४, ६-२ असे पराभूत केले.
हा सामना त्यांनी केवळ ६५ मिनिटांमध्ये जिंकला. त्यांना पाचवे मानांकन देण्यात आले आहे.