माजी विजेती मारिया शारापोव्हा हिने केस्निया पेव्हॅक या आपल्याच देशाच्या खेळाडूवर सरळ दोन सेट्समध्ये मात करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सलामी नोंदवली. तिच्याबरोबरच सॅबिनी लिसिकी व डॉमिनिक सिबुलकोवा यांनीही दुसरी फेरी गाठली. पुरुषांमध्ये नवव्या मानांकित केई निशिकोरी याला पराभवाचा धक्का बसला.
रशियाची सातवी मानांकित खेळाडू शारापोव्हा हिला केस्नियाविरुद्ध ६-१, ६-२ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत सव्र्हिसब्रेक मिळविला. बारावी मानांकित फ्लेव्हिया पेनेट्टा या इटलीच्या खेळाडूने ऑस्ट्रियाच्या पॅट्रिसिया अॅचलिटनेर हिला ६-२, ६-२ असे सहज हरविले. तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. लिसिकी या १६ व्या मानांकित खेळाडूला स्थानिक खेळाडू फिओना फेरो हिच्याविरुद्ध ६-१, ७-५ असा विजय मिळविताना थोडेसे झुंजावे लागले. दुसऱ्या सेटमध्ये फिओना हिने कौतुकास्पद लढत दिली मात्र लिसिकी हिने अनुभवाच्या जोरावर हा सेट घेत सामना जिंकला. स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवा हिने दुसऱ्या फेरीत स्थान मिळविताना फ्रान्सच्या व्हर्जिनी रॅझेनो हिच्यावर ७-५, ६-० असा विजय नोंदविला. पहिल्या सेटमध्ये रॅझेनो हिने सव्र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले मात्र एकदा तिची सव्र्हिस तोडली गेली. दुसऱ्या सेटमध्ये तिला एकही सव्र्हिस टिकविता आली नाही.
पुरुषांमध्ये स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझान याने निशिकोरी याच्यावर ७-६ (७-४), ६-१, ६-२ असा सनसनाटी विजय नोंदविला. त्याने केलेल्या वेगवान खेळापुढे निशिकोरी याचा बचाव निष्प्रभ ठरला. तसेच त्याने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. नेदरलँड्सच्या रॉबिन हास याने निकोलाय डेव्हिडेन्को याचे आव्हान ७-५, ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा