Akash Chopra’s reaction to Mohammad Siraj: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने आशिया कप २०२३ पूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग कॉम्बिनेशनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद सिराजच्या आधी शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या खेळाडूंना संधी देणे भारताला परवडणारे नाही, असे त्यांचे मत आहे.
हे तिन्ही खेळाडू ३० ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आगामी आशिया कपसाठी भारताच्या १७ सदस्यीय संघाचा भाग आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे संघातील आघाडीचे वेगवान गोलंदाज आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चोप्राने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजीचे विश्लेषण केले.
मोहम्मद सिराजबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “मोहम्मद सिराज विलक्षण आहे. त्यांची कारकीर्द लहान राहिली. त्याने २४ सामन्यांत २०.७ च्या सरासरीने आणि ४.७८ च्या इकॉनॉमी रेटने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे आकडे बुमराह आणि शमीपेक्षा चांगले आहेत. आशियामध्ये त्याची सरासरी १६.५७ आणि इकॉनॉमी रेट ४.५१ आहे. माजी भारतीय सलामीवीर पुढे म्हणाला, “त्याचे आकडे आशियामध्ये चांगले आहेत. त्यामुळे सिराजच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा प्रसिद्ध कृष्णाला खेळवले जाऊ शकते, असे जे बोलत होते, तुम्ही कोणालाही खेळवू शकत नाही. तुम्हाला सिराजलाच खेळवावे लागेल. तुम्हाला त्यालाच खेळवावे लागेल.”
हेही वाचा – AFG vs PAK: मांकडिंगवरून पेटला पुन्हा वाद, फजलहक फारुकीने शादाब खानला केले आऊट, पाहा VIDEO
सिराज, बुमराह आणि शमीचे राहिलेत उत्कृष्ट आकडे –
मोहम्मद सिराजने आशियातील १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६.५७ च्या सरासरीने आणि ४.५१च्या इकॉनॉमी रेटने ३५ बळी घेतले आहेत. भारतातील त्याचे आकडे आणखी चांगले आहेत. त्याने १४ सामन्यांमध्ये १५.४४ च्या सरासरीने आणि ४.३३ च्या इकॉनॉमी रेटने २९ खेळाडूंना बाद केले आहे. हे आकडे आश्चर्यकारक आहेत.
हेही वाचा – PAK vs AFG: मोहम्मद नबी आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंवर बाबर आझम संतापल्याचा VIDEO व्हायरल
दुसरीकडे, इतर गोलंदाजांबद्दल बोलायचे तर जसप्रीत बुमराहने ७२ सामन्यात २४.३ च्या सरासरीने आणि ४.६३ च्या इकॉनॉमी रेटने १२१ विकेट घेतल्या आहेत. त्याने प्रत्येक सामन्यात जवळपास दोन विकेट्स घेतल्या आहेत. आशियामध्येही त्याची सरासरी २३.९ आहे आणि त्याचा इकॉनॉमी रेट ४.६५ आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीची एकूण आकडेवारी चांगली आहे. त्याने ९० सामन्यांमध्ये २५.९ च्या सरासरीने १६२ विकेट्स घेतल्या आहेत. स्ट्राइक रेट आणि सरासरी जवळपास बुमराह सारखीच आहे. त्याची इकॉनॉमी थोडी उंच आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ५.६० आहे. आशियातील शमीची संख्या फारशी चिंताजनक नाही हे मान्य केले.