हैदराबाद येथे आजपासून दुसऱ्या कसोटीला सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतली. या सामन्यात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले. तो २९४वा भारतीय कसोटीपटू ठरला. पण हा आनंद अनुभवतानाच मुंबईकरांचा आणि क्रिकेट रसिकांचा हिरोमोड झाला.

कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्याच षटकात मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हा पायात क्रॅम्प आल्याने दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर संघाचे फिजिओ मैदानावर येऊन त्यांनी त्याला प्राथमिक उपचार दिले. परंतु त्या उपचारांचा परिणाम झाला नाही. त्यामुळे अवघे १० चेंडू टाकून शार्दूल ठाकूर तंबूत परतावे लागले.

दरम्यान, पहिल्या सामन्यातही शार्दूल ठाकूर १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला वगळून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या जोडीला अंतिम ११मध्ये समाविष्ट केले गेले होते. पण या दोघांना म्हणावा तसा आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवता आला नाही. दोनही डावात मिळून उमेश यादवने १४ षटके फेकली. त्यात त्याला केवळ १ बळी टिपता आला. तर मोहम्मद शमीने एकूण १२ षटके फेकून २ बळी टिपले. त्यामुळे मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे आणि दुसऱ्या कसोटीसाठी संघात शार्दूल ठाकूरला संधी मिळाली आहे.

Story img Loader