वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला अष्टपैलू म्हणून भारतीय संघातील प्लेइंग अकरामध्ये स्थान मिळायला हवे, असे विधान शार्दुलचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले आहे. शार्दुल हा अष्टपैलू खेळाडू म्हणून विकसित झाला पाहिजे, असेही लाड यांनी म्हटले. सध्या टीम इंडियामध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकत नाही. यामुळेच इंग्लंड दौर्‍यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. दिनेश लाड यांच्या म्हणण्यानुसार हार्दिक पंड्याची जागा अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूर घेऊ शकतो.

संकटामागून संकट..! अटकेनंतर कुस्तीपटू सुशील कुमारची नोकरीही जाणार?

स्पोर्ट्सकिडाशी खास गप्पा मारताना ते म्हणाले, “एक प्रशिक्षक म्हणून माझी शार्दुल ठाकूरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे अशी इच्छा आहे. कारण त्याची कामगिरी चांगली आहे. तो बॉल आणि बॅटने कामगिरी करू शकतो. जर तो अष्टपैलू म्हणून खेळला तर तो भारतीय संघासाठी एक प्लस पॉईंट ठरेल. पण सर्व काही संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांवर अवलंबून आहे.”

दिनेश लाड यांच्या म्हणण्यानुसार शार्दुल ठाकूरला अष्टपैलू म्हणून विकसित करण्याची गरज आहे. ते म्हणाले, “भारतीय संघात सध्या अष्टपैलू खेळाडूंचा अभाव आहे. हार्दिक र्वी अष्टपैलू म्हणून खेळत असे, पण आता दुखापतीमुळे तो गोलंदाजी करत नाही. संघाला वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यक आहे. त्यामुळे माझ्यामते हा खेळाडू शार्दुल ठाकूर आहे. पण चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला सलग सामन्यात संधी मिळायला हवी.”

मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शार्दुल ठाकूरने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात चांगली कामगिरी करत अष्टपैलू कौशल्य दाखवले.

कृत्रिम ऑक्सिजन घेत स्वयंपाक करणाऱ्या ‘आई’ला पाहून सेहवागचे डोळे पाणावले