Shardul Thakur Admitted in Hospital Mid of Irani Cup Match: लखनौ येथे इराणी करंडक स्पर्धेत मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईकडून सर्फराझ खानने द्विशतक झळकावले आणि शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. सर्फराझ खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ५३७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण यादरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर लगेचच मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला ताप आल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या खालच्या फळीतील फलंदाजाने एकना स्टेडियमवर १०२ अंश ताप असतानाही द्विशतक झळकावणाऱ्या सर्फराझ खान (नाबाद २२२) बरोबर नवव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

सर्फराझ खानबरोबरच्या ७२ धावांच्या भागीदारीत शार्दुल ठाकूरच्या महत्त्वपूर्ण ३६ धावांचाही समावेश होता. इराणी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईची धावसंख्या ९ बाद ५३६ धावा होती. सर्फराझ खान २२२ धावा करून नाबाद राहिला. सामन्याच्या पहिल्या दिवशीही शार्दुल ठाकूरला साधारण ताप होता. मात्र, दुसऱ्या दिवशी जवळपास दोन तास मैदानावर घालवल्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली. मैदानावर खेळताना त्याने २ ब्रेक घेतले.

Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
isha foundation case in supreme court DY Chandrachud
Isha Foundation Case: ‘अशा संस्थांमध्ये पोलिस किंवा सैन्य घुसवणं बरं नाही’; ईशा फाउंडेशनवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Akshay Shinde Mother and Father
Akshay Shinde Encounter : “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
IND vs BAN 2nd Test Highlights in marathi
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम

हेही वाचा – Mohammad Azharuddin: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांना ईडीचे समन्स, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

शार्दुल ठाकूरला हॉस्पिटलमध्ये केले दाखल

शार्दुल बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताच टीम डॉक्टरांनी त्याला तपासले. त्यानंतर मुंबई संघ व्यवस्थापनाने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे बुधवारी रात्री त्याला पूर्ण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तो खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही याचा निर्णय गुरुवारी डॉक्टर घेतील. इंडियन एक्स्प्रेसने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘दिवसभर त्याला बरे वाटत नव्हते आणि त्याला खूप ताप होता, हेच मुख्य कारण होते की तो फलंदाजीला उशीरा आला.’

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूतहेही वाचा –

सूत्रांनी सांगितले की, ‘शार्दुल ठाकूरला अशक्तपणा जाणवत होता आणि औषध घेतल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये झोपला. मात्र, कमजोर वाटत असतानाही त्याला फलंदाजी करायची होती. मलेरिया आणि डेंग्यूसाठी आम्ही त्याच्या रक्ताची तपासणी केली आहे. आम्ही रिपोर्ट्सच्या प्रतिक्षेत आहोत.’ ताप आणि थकवा असूनही, शार्दुलने ५९ चेंडूंवर १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

पायाच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच घऱच्या मैदानावरील सामना होता. त्याच्या पायावर यावर्षी जूनमध्ये लंडन येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, परंतु वेदना होत असतानाही तो खेळला आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका नियोजित असल्याने, शार्दुल ठाकूर या देशांतर्गत हंगामात आपला फिटनेस दाखवत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्नात होता.