नवीन वर्षात आपल्या पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात भारतीय संघाने धडाकेबाज पद्धतीने केली. न्यूझीलंडच्या त्यांच्यात मैदानात भारतीय संघाने ५-० च्या फरकाने हरवलं. या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने तरुण खेळाडूंना संधी दिली. मुंबईकर शार्दुल ठाकूरनेही टी-२० मालिकेत आपली चमक दाखवली. मात्र गोलंदाजीत धावांची खैरात केल्यामुळे सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरविरोधात वातावरण तयार झालं होतं.

अवश्य वाचा – Ind vs NZ : बुमराहची झोळी रिकामीच, कारकिर्दीत पहिल्यांदाच घडला असा प्रकार

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यातही शार्दुलने अशाच प्रकारे धावा दिल्या. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शार्दुलला विश्रांती देण्यात यावी अशी मागणी सुरु केली. मात्र भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात शमीला विश्रांती देऊन नवोदीत नवदीप सैनीला संघात स्थान दिलं आणि शार्दुल ठाकूरचं स्थान कायम ठेवलं. मात्र चहुबाजूंनी टीका होत असतानाही २०२० वर्षात आतापर्यंत शार्दुल ठाकूरच भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. जाणून घ्या आकडेवारी…

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत शार्दुलने अनेकना जमलेली जोडी फोडण्याचं काम केलं आहे. याव्यतिरीक्त फलंदाजीतही अखेरच्या फळीत तो चांगली कामगिरी करतो. दुसऱ्या वन-डे सामन्यातही शार्दुलने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे आगामी काळात शार्दुल किती काळासाठी आपलं संघातलं स्थान राखून ठेवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader