Shardul Thakur won the gold medal on the strength of his excellent fielding: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या अनुभवी खेळाडूने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आणि मैदानात त्याचा उत्साहही उत्कृष्ट राहिला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेतला आणि अफगाणिस्तानविरुद्धही उत्कृष्ट झेल घेतला. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर फील्डिंग कोच टी दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्याला खास सुवर्णपदक दिले. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हे पदक विराटनंतर दुसऱ्या खेळाडूला देण्यात आले.

वास्तविक, या विश्वचषकात भारतीय संघाने ड्रेसिंग रूमचे वातावरण निरोगी ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, सामन्यानंतर संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक प्रदान केले जात आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला हे पदक मिळाले होते. आता दुसऱ्या सामन्यात हे पदक विराटकडून दुसऱ्या खेळाडूकडे गेले आहे. या सामन्यानंतर शार्दुल ठाकूरला आता हा पुरस्कार मिळाला आहे. या संपूर्ण आनंदी वातावरणाचा व्हिडिओ बीसीसीआय टीव्हीवर आहे. त्याची लिंक बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका

शार्दुल ठाकुरची कशी राहिली कामगिरी?

शार्दुल ठाकूरने एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात विश्वचषकात पदार्पण करताना त्याने रहमत शाहच्या रूपाने पहिली विकेटही घेतली. एवढंच नाही तर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने धोकादायक रहमानउल्ला गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यासाठी अप्रतिम झेल घेतला. यासाठी त्याला सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला. गोलंदाजीत शार्दुलने ६ षटके टाकली आणि ३१ धावांत एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: शुबमन गिलनंतर आणखी एका भारतीय दिग्गजाला डेंग्यूची लागण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून झाला बाहेर

पाकिस्तानविरुद्ध संधी मिळेल का?

टीम इंडिया आता तिसरा सामना १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात शार्दुलला संधी मिळेल की नाही हा मोठा प्रश्न असेल. पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन फिरकीच्या अनुकूल ट्रॅकवर आला होता. त्यानंतर दिल्लीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या सामन्यात शार्दुलला संधी मिळाली. आता अहमदाबादमध्येही फलंदाजीसाठी योग्य खेळपट्टी आहे. अशा परिस्थितीत शार्दुलला पुन्हा एकदा पसंती दिली जाऊ शकते.

Story img Loader