Sreesanth shared a video and revealed the controversy with Gautam Gambhir : दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि श्रीसंत लिजेंड्स लीग क्रिकेटमधील लाइव्ह सामन्यादरम्यान भिडले. बुधवारी, सुरतमध्ये या लीगच्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. गंभीर कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर श्रीसंत गुजरातचा गोलंदाज आहे. या सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. इतकेच नाही तर सामन्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

श्रीसंत आणि गौतम यांच्यात झाला वाद –

लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने श्रीसंतचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंतने निराशेने गंभीरकडे पाहत काही शब्द बोलल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Image of L&T Chairman And Logo
“काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज”, अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर L&T चे स्पष्टीकरण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Manoj Tiwary criticism India head coach Gautam Gambhir after BGT failure at Australia.
Manoj Tiwary : ‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी खेळाडू मनोज तिवारीची भारतीय संघाच्या कोचवर टीका; म्हणाला, ‘तो जे बोलतो ते…’

याला प्रत्युत्तर म्हणून गंभीरने या वेगवान गोलंदाजाकडे रोखून हातवारे केले. हा वाद इथेच थांबला नाही. एका चाहत्याने स्टँडवरून रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, हा व्हिडीओ कॅपिटल्सचा फलंदाज बाद झाल्यानंतरचा आहे. त्या ब्रेकदरम्यान गंभीर आणि श्रीसंतमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – LLC 2023 : लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले, वादाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

श्रीसंतने गौतमवर केले गंभीर आरोप –

या व्हिडीओमध्ये श्रीसंत असे म्हणताना ऐकू येत आहे की, “मिस्टर फायटरसोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्ट करायचे होते. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठांचाही आदर करत नाही, अगदी वीरू भाई (सेहवाग)चाही नाही. आजही तेच घडले. कोणतीही चिथावणी न देता तो माझ्याशी काहीतरी बोलत राहिला, जे अत्यंत असभ्य होते. त्याने त्या गोष्टी बोलायला नको होत्या.”

या सामन्यादरम्यान गंभीर मला काय म्हणाला ते मी उघड करणार असल्याचे श्रीसंतने सांगितले. या शब्दांमुळे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे मन दुखावल्याचे त्याने सांगितले. तो म्हणला, “येथे माझी चूक नव्हती. मला फक्त गोष्टी साफ करायच्या होत्या. मिस्टर गौतीने काय केले ते आज ना उद्या समोर येईल. क्रिकेटच्या मैदानावर त्याने जे शब्द वापरले, ते मी सहन करु शकत नाही. माझ्या कुटुंबाने, माझ्या राज्याने खूप काही पाहिले आहे. तुमच्या पाठिंब्याने मी ही लढाई लढली आहे. आता लोक मला विनाकारण अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने अशा काही गोष्टी बोलल्या, ज्या बोलायला नको होत्या. तो जे काही बोलला ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन.”

हेही वाचा – ‘Handling the Ball’ म्हणजे काय? मुशफिकुर रहीमच्या विकेटवरून गोंधळ; जाणून घ्या आयसीसीचा संपूर्ण नियम

श्रीसंतने विराट-गंभीर वादावरही प्रतिक्रिया दिली –

श्रीसंतने येथे गंभीर आणि कोहली यांच्यातील वादावरही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “आपल्याच सहकाऱ्यांचा आदर करत नाही, तर लोकांचे प्रतिनिधित्व कसे करणार. प्रसारणादरम्यानही जेव्हा त्याला विराटबद्दल विचारले जाते, तेव्हा तो काहीच बोलत नाही. तो वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलतो. आता मला एवढेच सांगायचे आहे की मी खूप दुःखी आहे, माझे कुटुंब, माझे प्रियजन दुःखी आहेत. मी त्याच्यासाठी कोणताही अपशब्द वापरला नाही. तो सतत काही ना काही बोलत राहिला.”

Story img Loader