Congress MP Shashi Tharoor criticizes BCCI : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड न झाल्याने क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. सॅमसनने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची वनडेत निवड झाली नाही. दुसरीकडे, झिम्बाब्वे दौऱ्यावर अभिषेकने शानदार शतक झळकावले. असे असूनही त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची निवड न केल्यामुळे काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संघ निवडीवर टीका केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकने आपल्या निडर फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. पंजाबच्या या फलंदाजाने आपल्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते, पण नंतर यशस्वी जैस्वाल संघात आल्यावर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु लागला.

PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान

काँग्रेसच्या खासदाराने घेतला खरपूस समाचार –

सॅमसन आणि अभिषेक या दोघांनाही एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आश्चर्यकारकपणे त्यांना वगळण्यात आले. सॅमसनला टी-२० संघात निश्चितच स्थान मिळाले. शशी थरूर यांनी एक्सवर आपले मत मांडताना आणि निवड मनोरंजक असल्याचे वर्णन केले. काँग्रेस खासदाराने असेही म्हटले की, भारतात क्वचितच यशाचा रंग निवडकर्त्यांसाठी इतका महत्त्वाचा असतो.

हेही वाचा – Sanju Samson : कुमार संगकारा वापरतोय माझी बॅट! संजू सॅमसनची खास पोस्ट, राजस्थान रॉयल्सने शेअर केला VIDEO

शशी थरूर यांनी काय लिहिले?

शशी थरूर यांनी लिहिले की, “या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड मनोरंजक आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनची वनडे संघात निवड झालेली नाही. त्याचवेळी भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत टी-२० शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माची कोणत्याच संघात निवड झालेली नाही. त्यामुळे क्वचितच भारताच्या जर्सीतील यशाचा रंग निवडकर्त्यांसाठी इतका महत्त्वाचा असेल. तरीही संघाला शुभेच्छा.”

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :

भारताचा टी-२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – India vs Sri Lanka T20 ODI Series : सूर्यकमार यादव नवा टी-२० कर्णधार; रोहित-विराट वनडे मालिका खेळणार, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.