Paris Paralympics India’s Armless Archer Broke World Record: पॅरिस पॅरालिम्पिक खेळांना पॅरिसमध्ये सुरुवात झाली आहे. खेळांच्या पहिल्या दिवशी भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू, तायक्वांदो आणि तिरंदाज मैदानात उतरले होते. भारताची एकूणच पॅरालिम्पिकमधील सुरूवात चांगली झाली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आणि तिरंदाजांनी यशस्वी कामगिरी करत पुढील फेरी गाठली आहे. यादरम्यान भारतीय पॅरा ॲथलीट शीतल देवीने गुरुवारी इतिहास घडवला आहे.

हाताविना तिरंदाजी करणारी तिरंदाज शीतल देवी हिने महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड तिरंदाजीच्या पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि ७२० पैकी ७०३ गुण मिळवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. या स्पर्धेत ती ७०३ गुणांसह दुसरी आली. शीतलने फक्त पुढील फेरी गाठली नाही तर वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे. पण अवघ्या एका गुणासाठी शीतल नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून लांब राहिली.

Ranji Trophy 2024 Drying Pitch By Burning Cow Dung Cakes Desi Jugaad In Match Bihar vs Karnataka
Ranji Trophy : बिहार-कर्नाटक सामन्याची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ‘देसी जुगाड’, शेणाच्या गवऱ्या जाळतानाचा फोटो व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
zee marathi awards part 1 winner list navri mile hitlerla fame actress vallari got 3 awards
Zee Marathi Awards 2024 : सर्वोत्कृष्ट सासू अन् सून ठरली ‘ही’ एकच अभिनेत्री! तर, सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला…
Fathers love for daughter emotional Video
मुलींनो २२ दिवसांचं प्रेम की २२ वर्षांचं बापाचं प्रेम; वयात येणाऱ्या मुलीला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO; नक्की बघा
indian wrestlers to play upcoming world championships
कुस्तीगिरांचा मार्ग मोकळा! जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागास सरकारचा हिरवा कंदील
Shahnaz Habib who sees a different world through book Airplane Mode
‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब
Dog jumps to save drowning owner
पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने मारली उडी; VIDEO पाहून व्हाल अवाक्
zee marathi awards priya bapat sings abhalmaya serial song
Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”

१७ वर्षीय शीतलने ग्रेट ब्रिटनच्या फोबी पीटरसनचा ६९८ गुणांचा रँकिंग फेरीचा जागतिक विक्रम मोडला. मात्र, तुर्कीच्या ओझनूर गिरदीने ७०४ गुणांसह नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आणि अव्वल स्थानी राहून राऊंड ऑफ १६ मध्ये पोहोचली. रँकिंग फेरीत शीतल दुसऱ्या क्रमांकावर राहिली. आता शीतल ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता तिचा उपांत्यपूर्व सामना खेळेल. तिरंदाजी पात्रता फेरीत भारताची सरिताही सहभागी झाली होती. पात्रता फेरीत तिने ६८२ गुण मिळवले. ती ९व्या स्थानावर राहिली. ३० ऑगस्ट रोजी सरिता उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी खेळेल.

हेही वाचा – Lakshya Sen-Deepika Padukone: दीपिका पदुकोणने का केला लक्ष्य सेनला फोन? त्यानेच स्पष्ट केलं कारण

Paris Paralympics: पॅरा बॅडमिंटनपटूंची पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरीसह सुरूवात

पॅरा बॅडमिंटन – मिश्र दुहेरी SL3-SU5 गट स्टेज सामना
नितेश कुमार, तुलासिमाथी मुरुगेसन विरुद्ध सुहास यथीराज,पलक कोहली – नितेश-मुरुगेसन विजयी

पॅरा तायक्वांदो: महिला K44-४७ किलो वजनी गट
अरुणा तन्वर विरुद्ध तुर्कीची नुर्सिहान एकिन्सी – अरुणा पराभूत

पॅरा बॅडमिंटन – महिला एकेरी SL3 गट सामना
मनदीप कौर विरुद्ध नायजेरियाची एनिओला बोलाजी – मनदीप पराभूत

पॅरा बॅडमिंटन – महिला एकेरी SL3 गट सामना
मानसी जोशी विरुद्ध कोनिता सायकुरोह – मानसी जोशी पराभूत

पॅरा बॅडमिंटन – पुरुष एकेरी SL4 गट स्टेज सामना
सुकांता कदम विरुद्ध मलेशियाचा मोहम्मद अमीन बुरहानुद्दीन. – सुकांत कदम विजयी

पॅरा बॅडमिंटन – पुरुष एकेरी SL4 गट सामना
तरुण ढिल्लन विरुद्ध ब्राझीलचा रॉजेरियो डी ऑलिव्हेरा – तरुण ढिल्लन विजयी

पॅरा बॅडमिंटन – पुरुष एकेरी SL3 गट स्टेज सामना
नितेश कुमार विरुद्ध मनोज सरकार. – नितेश विजयी

पॅरा तिरंदाजी – शीतल देवी आणि सरिता महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड रँकिंग फेरीत – शीतल देवी द्वितीय आणि सरिता नवव्या स्थानी

पॅरा तिरंदाजी – हरविंदर सिंग पुरुषांची वैयक्तिक रिकर्व्ह रँकिंग फेरी – हरविंदर नवव्या स्थानी

पॅरा बॅडमिंटन – पलक कोहली विरुद्ध फ्रान्सच्या मिलेना सुरो महिला एकेरी SL4 गट स्टेज सामन्यात –

पॅरा बॅडमिंटन – महिला एकेरी SU5 गट स्टेज सामना
मनीषा रामदास विरुद्ध फ्रान्सच्या मौडे लेफोर्ट – मनीषा रामदास विजयी

पॅरा बॅडमिंटन – पुरुष एकेरी SH6 गट स्टेज सामना
शिवराजन सोलामलाई विरुद्ध इंडोनेशियाचा सुभान – शिवराजन पराभूत

पॅरा बॅडमिंटन – महिला एकेरी SH6 गट स्टेज सामना
नित्या श्री सिवन विरुद्ध यूएसएची जेसी सायमन – नित्या श्री विजयी

पॅरा तिरंदाजी – राकेश कुमार आणि श्याम सुंदर स्वामी पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड रँकिंग फेरीत –

पॅरा तिरंदाजी – महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह रँकिंग फेरीत पूजा.