Sherfane Rutherford century in the Abu Dhabi T10 : अबू धाबी टी१० लीग स्पर्धेत म्हणजेच प्रत्येकी १० षटकांच्या सामन्यात शतक झळकावण्याची करामत नॉदर्न वॉरियर्स संघाच्या शेरफन रुदरफोर्डने केली. अबू धाबी इथे झालेल्या लढतीत नॉदर्न वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना १४२ धावांची मजल मारली. १४२ पैकी १०३ धावा शेरफन रुदरफोर्डच्या होत्या. शेरफनने ७ चौकार आणि १० षटकारांसह ४० चेंडूत नाबाद १०३ धावांची अविश्वसनीय खेळी केली.

शेरफन रुदरफोर्डचे वादळी शतक –

२६वर्षीय शेरफन वेस्ट इंडिजचा असून जगभरात विविध टी२० लीगमध्ये नियमितपणे खेळतो. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळला आहे. शेरफनने ९ वनडे आणि २८ टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे.

त्याच्या सहकाऱ्यांपैकी कॉलिन मुन्रो, जॉन्सन चार्ल्स, अझमतुल्ला ओमरझाई आणि झियूर रहमान यांना एकेरी धावसंख्याही पार करता आली नाही. युपी नबाब संघातर्फे टायमल मिल्सने २ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे नबाब संघाने हे लक्ष्य ५ चेंडू आणि ९ विकेट्स राखून पार केलं. आंद्रे फ्लेचरने २७ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. रहमनुल्ला गुरबाझने २३ चेंडूत ४४ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

हेही वाचा – Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

टी२० लीगच्या धर्तीवर आता दहा षटकं, १०० चेंडू अशा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अबू धाबी टी१० स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. या स्पर्धेत अजमान बोल्ट्स, बांग्ला टायगर्स, चेन्नई ब्रेव्हर्स, डेक्कन ग्लॅडिएटर्स, दिल्ली बुल्स, न्यूयॉर्क स्ट्रायकर्स, नॉदर्न वॉरियर्स, सॅम्प आर्मी, टीम अबू धाबी, युपी नबाब असे १० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत जोस बटलर, रशीद खान, लायम लिव्हिंगस्टोन, निकोलस पूरन असे जगभरातले नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत.