Shikhar Dhawan announced his retirement from domestic and international cricket : टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा एक भाग असलेल्या शिखर धवनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. धवनने २४ ऑगस्ट रोजी सकाळी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. व्हिडिओ पोस्ट करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आता माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे. मी माझ्या सोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद!’

शिखर धवनची गणना जागतिक क्रिकेटमधील यशस्वी सलामीच्या फलंदाजांमध्ये केली जाते. २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’

PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
RJ Kar Hospital
Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Goa, citizens Goa angry, Impact of tourism,
गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?

शिखर धवनने मानले सर्वांचे आभाार –

शिखर धवन पुढे म्हणाला, “सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी आणि मदन शर्मा जी यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो जिथे मला माझे कुटुंब मिळाले आणि तुम्हा लोकांचे समर्थन आणि प्रेम मिळाले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. आज माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देताना देशासाठी खेळलो याचा मला अभिमान आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.”

हेही वाचा – Paralympics 2024 : पॅरालिम्पिक कधी पासून सुरू होणार, किती भारतीय खेळाडूंचा असणार सहभाग? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द –

डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, जेव्हा त्याला ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. यानंतर शिखर धवनने मागे वळून पाहिले नाही आणि त्याला टीम इंडियासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या, तर त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली.

हेही वाचा – Paralympic 2024 : कोण आहेत चंदू चॅम्पियन? ज्यांनी देशासाठी ९ गोळ्या झेलल्या आणि सुवर्णपदकही पटकावलं

याशिवाय, वनडेमध्ये धवनने ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ अर्धशतकांसह २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने धवन आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याची गणना आयपीएलच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते, ज्यामध्ये धवनने २२२ सामन्यांमध्ये ३५.०७ च्या सरासरीने ६७६८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ५१ अर्धशतके आहेत.