Ravi Shastri on Shikhar Dhawan: आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची निवड प्रक्रिया सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आशिया चषक ही एक मोठी स्पर्धा आहे आणि टीम इंडियाला आतापर्यंत स्थिर संघ तयार करता आलेला नाही. प्लेइंग-११ असो वा कॉम्बिनेशन, भारतीय संघ प्रत्येक स्तरावर संघर्ष करत आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या भूमिकेसाठी इशान किशन आणि शुबमन गिल हे प्रबळ दावेदार आहेत. यावर आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिखर धवनबाबत सूचक विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी आशिया चषक २०२३ आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकावर मोठे विधान केले आहे. शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शिखर धवनला कदाचित टीम इंडियात हवा तसा सन्मान मिळाला नाही.” ते पुढे म्हणाले, “लोकांनी शिखर धवनला इतके श्रेय कधीच दिले नाही, जे त्याला मिळायला हवे होते. तो एक अप्रतिम खेळाडू आहे. माझ्यामते शिखर धवनवर अन्याय झाला आहे.”

हेही वाचा: Asia Cup 2023: “कोणी संघात जागा खरेदी…”, राहुल, श्रेयस अय्यरबद्दल रवी शास्त्री अन् दोन माजी निवडकर्त्यांमध्ये झाली खडाजंगी

एकदिवसीय विश्वचषक २०१९ बद्दल बोलताना रवी म्हणाले, “जेव्हा आम्ही २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हरलो तेव्हा संघाला त्याची खूप आठवण झाली.” माहितीसाठी की, त्या विश्वचषकात धवनला सुरुवातीच्या टप्प्यानंतर दुखापत झाली होती आणि त्याला संघातून बाहेर जावे लागले होते. शास्त्री पुढे म्हणाले की, “डावखुरा फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये असणे याने तुम्हाला मदत होते. जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी येतो परंतु डाव्या हाताच्या फलंदाजासाठी तो बाहेर जातो. अशा स्थितीत डावखुऱ्या फलंदाजाला धावा करणे सोपे जाते.”

बीसीसीआयने गेल्या महिन्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली होती. या स्पर्धेसाठी शिखर धवनला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. ऋतुराज गायकवाडला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आणिर धवनचा संघात समावेश सुद्धा करण्यात आला नव्हता. शिखर धवनलाही याचं आश्चर्य वाटलं. एका निवेदनात त्याने आपली व्यथाही मांडली होती.

हेही वाचा: Kapil Dev: “रोहित शर्मा-विराट कोहलीने किती डोमेस्टिक सामने खेळले?” आशिया कपआधी कपिल देव यांनी साधला निशाना

विश्वचषकात शिखर धवनचा उत्कृष्ट विक्रम

शिखर धवनच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर विश्वचषकात त्याचा मोठा विक्रम आहे. त्याने २०१५ आणि २०१९ मध्ये दोन विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने एकूण १० सामन्यांच्या १० डावात ५३७ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३७ धावा आहे. या स्पर्धेत धवनने एकूण ३ शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट सुमारे ९४ आणि सरासरी ५३.७ आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतकेही केली आहेत. त्याने भारतासाठी १६७ एकदिवसीय सामन्यांच्या १३४ डावांमध्ये ६७९३ धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याच्या नावावर ३४ कसोटी सामन्यांमध्ये २३१५ धावा आणि ६८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७५९ धावा आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan does not get the credit he deserves ravi shastris biggest statement on team india avw