Shikhar Dhawan emotional message for son Zoravar : भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने शनिवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, धवन त्याचा ११ वर्षांचा मुलगा झोरावरबद्दल बोलताना भावुक झाला. त्याने आशा व्यक्त केली की मुलगा झोरावरला त्याच्या निवृत्तीबद्दल कळेल. धवनने आपल्या मुलाला भावनिक संदेश दिला. धवनने आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून मुलगा झोरावरचा ताबा आयशा मुखर्जीकडे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, त्याला भेटण्याचे आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय झोरावरची धवनशी भेट करून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. परंतु, धवनच्या अलीकडील पोस्टवरून असे सूचित होते की त्याने अनेक महिन्यांपासून झोरावरला पाहिले नाही किंवा बोलला नाही. मुलगा झोरावरला त्याच्याबद्दल काही माहिती आहे की नाही हे धवनला माहीत नाही. आता निवृत्तीनंतर धवनने मुलगा झोरावरला भावनिक संदेश दिला आहे.

शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक मेसेज –

तो म्हणाला, “झोरावर आता ११ वर्षांचा झाला आहे. मला आशा आहे की त्याला माझी निवृत्तीबद्दल आणि माझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल माहिती असेल. पण एका क्रिकेटपटूपेक्षा, मला आवडेल की जोरावरने मला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावे, जो चांगले काम करतो आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांमध्ये सकारात्मकता आणतो.” झोरावरला २९ डिसेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना धवनने खुलासा केला होता की, त्याला झोरावरला पाहण्यास किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेर सूर्यकुमार यादवकडून शिकतेय क्रिकेट, इन्स्टा स्टोरीवर शेअर केला खास फोटो

शिखर धवन २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले, ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan emotional message for son zoravar after announced his retirement from domestic and international vbm