मोहाली कसोटी सामन्यात आज(रविवार) चौथ्या दिवशी शिखर धवनचे व्दिशतक थोडक्यात हुकले, शिखर १८७ धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही एका धावेतच तंबुत परतला आहे. शिखर धवनने शनिवारी आँस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणातच त्याने अवघ्या ८५ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. पदार्पणातमध्ये जलद शतक झळकावण्याचा हा नवा विक्रम आहे. आज सकाळच्या सत्रात शिखर धवनने द्विशतक पूर्ण करावे, अशी क्रिडारसिकांची इच्छा होती. पण, तो १८७ धावांवर असताना लिऑनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा अवघ्या दोन धावांवर सीडलच्या गोलंदाजीवर बाद झाला. आत्ता सचिन तेंडुलकर आणि मुरली विजय संघाच्या धावसंख्येत वाढ करत आहेत. त्या दरम्यान मुरली विजयने चौकार खेचत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. या मालिकेतील विजयचे हे दुसरे शतक आहे.
शिखर धवनचे व्दिशतक हुकले
मोहाली कसोटी सामन्यात आज(रविवार) चौथ्या दिवशी शिखर धवनचे व्दिशतक थोडक्यात हुकले, शिखर १८७ धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही एका धावेतच तंबुत परतला आहे. शिखर धवनने शनिवारी आँस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणातच त्याने अवघ्या ८५ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले.
First published on: 17-03-2013 at 11:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan got out on