Viral Video : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे. इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला सामना मँचेस्टर येथे खेळण्यात येणार आहे. भारताने नुकत्याच आयर्लंडबरोबर झालेल्या टी२० सामन्यात २-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. पण आयर्लंडचा संघ हा इंग्लंडच्या तुलनेत फारच दुबळा होता. तसेच, इंग्लंडने टी२० मध्ये दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या मातब्बर संघांविरुद्ध चांगली कामगिरी करत ९ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी या सामन्यात विजय मिळवणे, तितकेसे सोपे नसेल. पण या सर्वांची चिंता न करता भारताचे २ खेळाडू ‘बाथरूम डान्सर’ बनले आहेत.
अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर शिखर धवन हे दोघेही मैदानावर आपला खेळ खेळतात. पण मैदानाबाहेर ते दोघेही अतिशय रिलॅक्स मूडमध्ये नेहमी दिसतात. अशाच एका क्षणाची व्हिडीओ हार्दिक पांड्याने ट्विटरवर पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये धवन आणि हार्दिक दोघे बाथरूममधील आरशासमोर नाचत आणि गात आहेत.
हा पहा व्हिडीओ –
Me & jatta caught in action. We love dancing & singing. @SDhawan25 pic.twitter.com/P4vqsuxUVh
— hardik pandya (@hardikpandya7) July 1, 2018
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी२० सामन्याआधी हार्दिक आणि शिखर या दोघांचा हा रिलॅक्स आणि ‘कूल’ अंदाज सोशलमाध्यमांवर व्हायरल होत असून साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.