श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवनचं सौरव गांगुलीने कौतुक केले. शिखर धवन हा वनडेतील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. गेल्या पाच-सहा वर्षातील एकदिवसीय सामन्यांतील त्याचा फॉर्म हा लाजवाब म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलिया असो , इंग्लंड असो किंवा आता श्रीलंका असेल कुठल्याही खेळपट्टीवर तो कायम पूर्ण फॉर्ममध्ये राहिला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी विशेष बहरते. याशिवाय, त्याला एकदिवसीय प्रकारात त्याला आपल्या क्षमतेवर पूरेपूर विश्वास असल्याचे गांगुलीने ‘इंडिया टुडे’शी बोलतान सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डावाला आकार कसा द्यायचा, हे धवन योग्यप्रकारे जाणतो. यदाकदाचित पहिल्या दोन विकेट लवकर पडल्या तर धवन अशा परिस्थितीतही संघाची एक बाजू लावून धरतो. त्याच्या खेळातील हा विशेष गूण म्हणावा लागेल. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहणे, हा अद्भुत अनुभव असतो. प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाजीचा तोफखाना कितीही मोठा असला किंवा एखाद्या संघाची गोलंदाजी अगदीच सामान्य असली तरीही संघाचा आणि वैयक्तिक धावसंख्येचा फलक हलता ठेवणे हे कायमच आव्हान असते. शिखर धवन ही कामगिरी खूपच उत्तमरित्या पार पाडतो, असेही गांगुलीने सांगितले.

NIKE च्या क्रिकेट ‘कीट’चा दर्जा घसरला; टीम इंडियातील खेळाडू नाराज

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने लंकेवर ९ गडी राखून मात केली होती. शिखर धवनचं शतक आणि आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने श्रीलंकेवर मात करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताच्या डावाचा हिरो ठरला तो सलामीवीर शिखर धवन, त्याने केवळ ९० चेंडुंमध्ये १३२ धावांची खेळी केली. त्याच्या या आक्रमक खेळीत तब्बल २० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

… म्हणून धवन यशाच्या शिखरावर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan is a terrific one day player says sourav ganguly