माजी कर्णधार कपील देव यांचे मत
आयसीसी चॅम्पिन्स करंडक मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनने शतक ठोकले. यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी शिखर धवन भारतीय संघाच्या फलंदाजीचे उज्ज्वल भविष्य साकारणारा फलंदाज असल्याचे म्हटले. शिखरमध्ये परिस्थितीला सांभाळण्याची कला असल्याचेही कपील देव म्हणाले.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात शिखरने ताबडतोड फलंदाजीकरत आपले शतक गाठले. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाची खेळी ३३१ धावांपर्यंत पोहचू शकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २६ धावांनी पराभव झाला. धवन आणि रोहीत यांना सलामीला फलंदाजी करण्यासाठीच्या निर्णयावर कपील देव म्हणाले, “मुरली विजयला बसवून त्याच्या जागी रोहीत शर्माला सलामी फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावरून अनेक प्रश्न निर्माण केले जात होते, पण माझ्या मते शिखर आणि रोहीतला सलामी फलंदाजीला पाठवणे ही युक्ती योग्य होती.”