How did Shikhar Dhawan get the name Gabbar : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवनने क्रिकेटला अलविदा केला आहे. ३८ वर्षीय धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत तो आता आयपीएलमध्ये पण खेळताना दिसणार नाही. धवन बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याच्या पुनरागमनाची आशा नव्हती. अशा स्थितीत त्यानी आज निवृत्ती जाहीर केली. त्याला क्रिकेट विश्वात ओळखले जायचे. पण शिखर धवनच नाव गब्बर कसं पडलं? जााणून घेऊया.

शिखर धवन २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’

Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Former pm jawaharlal nehru Kumbh Snan Fact Check Photo
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी खरंच कुंभ मेळ्यात केले होते पवित्र स्नान? वाचा, चर्चेतील व्हायरल फोटोमागचे सत्य काय?

शिखर धवनला गब्बर का म्हणतात?

शिखर धवनला ‘गब्बर’ का म्हणतात याचा खुलासा खुद्द शिखरने एका मुलाखतीत केला होता. स्पोर्ट्सतकला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवन म्हणाला होता की, “मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना ‘सिली पॉईंट’वर उभा होतो. त्यावेळी विरोधी संघातील खेळाडूंनी मोठी भागीदारी केल्याने आमचे सर्व खेळाडू निराश झाले होते. अशा परिस्थितीत मी जोरात ओरडलो, ‘बहुत याराना है सुअर के बच्चो’ यानंतर सर्व खेळाडू जोर-जोरात हसू लागले. त्यानंतर आमच्या प्रशिक्षकाने (विजय) तिथून माझे नाव गब्बर ठेवले. हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की जगभरातील क्रिकेट चाहते आताही मला गब्बर म्हणतात.”

हेही वाचा – Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, जेव्हा त्याला ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. यानंतर शिखर धवनने मागे वळून पाहिले नाही आणि त्याला टीम इंडियासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या, तर त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली. याशिवाय, वनडेमध्ये धवनने ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ अर्धशतकांसह २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत.

Story img Loader