Shikhar Dhawan Networth assets salary income cars collection : २४ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी सकाळी भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता गब्बर कधीही भारताकडून खेळताना दिसत नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला. शिखर धवन बराच काळ टीम इंडियापासून दूर होता. असे असूनही त्याची कमाई चांगली राहिली. शिखर धवन कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. चला त्याच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया.

शिखर धवनची एकूण संपत्ती किती?

२०२४ मध्ये ३८ वर्षीय शिखर धवनची एकूण संपत्ती सुमारे $17 दशलक्ष (अंदाजे १२० कोटी रुपये) असल्याचे मानले जाते. क्रिकेट खेळण्यासोबतच तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो. गब्बर अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे. याशिवाय धवनकडे महागडी कार आणि बाईक्स आहेत. त्याची आयपीएलमधूनही चांगली कमाई होते. धवनकडे काही आलिशान मालमत्ताही आहेत.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

ब्रँड एंडोर्समेंट –

शिखर धवन अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. त्याचबरोबर तो बऱ्याच कंपन्यांचा चेहरा देखील आहे. तो बोट, ओप्पो, लेज, जिओ, एयरटेल इंडिया, कुरकुरे, नेरोलॅक पेंट्स, जीएल कॅल्टेक्स यांसारख्या कंपन्यांशी संबंधित आहे. ज्यामधून तो चांगली कमाई करतो. याशिवाय, ड्रीम 11 आणि फिव्हर एफएमसोबतही एक करार आहे, ज्या अंतर्गत त्याला दरमहा पैसे मिळतात, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – Shikhar Dhawan Retirement : शिखर धवनचं ‘गब्बर’ हे नाव कसं पडलं? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण

शिखर धवनची आयपीएलमधील कमाई-

जोपर्यंत शिखर धवन भारतीय संघाशी संबंधित होता, तोपर्यंत त्याला बीसीसीआयकडूनही मानधन मिळत असे. मात्र, वार्षिक करारातून बाहेर पडल्यानंतर त्याचे बीसीसीआयकडून येणारे मानधन बंद झाले. पण शिखरने आयपीएलच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. गब्बर २००८ पासून आयपीएल खेळत आहे. २०२४ पर्यंत धवनने आयपीएलमध्ये एकूण ९१.८ कोटी रुपये कमावले आहेत.

शिखर धवनची गुंतवणूक –

शिखर धवनकडे दिल्ली आणि मुंबईत आलिशान घरे आहेत. २०२० मध्ये या मालमत्तांची किंमत १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्याचबोबर शिखर धवनने योग आणि वेलनेस बेस्ड स्स्टार्टअप SARVA मध्ये गुंतवणूक केली आहे. त्याने अलीकडे अपस्टॉक्स या ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग ऍप्लिकेशनमध्येही गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा – Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा, भावनिक VIDEO शेअर करत जाहीर केली निवृत्ती

शिखर धवनच्या आलिशान कार –

शिखर धवनचा स्वतःचा व्यवसायही आहे. तो DaOne ग्रुपचा मालक आहे. याच ग्रुपने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स नावाचा संघ विकत घेतला आहे. धवनकडे कोट्यवधींच्या कार आणि बाइक्स आहेत. तो ऑडी ए6, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, बीएमडबल्यू एम8, बीएमडबल्यू 6 जीटी मध्ये प्रवास करतो. याशिवाय धवनकडे सुझुकी हायाबुसा बाइकही आहे.