Shikhar Dhawan Ladoo Mutya Baba Video Viral: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे पण तरी तो सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय असतो. शिखर धवनच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. शिखर धवन इन्स्टाग्रामवर अनेक ट्रेंडिंग व्हीडिओ शेअर करत असतो. असाच एक नवा व्हीडिओ शिखर धवनने शेअर केला आहे. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध चमत्कारी बाबा लड्डू मुत्याची नक्कल करणारा व्हीडिओ धवनने शेअर केला आहे. एका कन्नड गाण्याच्या माध्यमातून आधुनिक लड्डू मुत्या बाबासारखा अभिनय करत हा व्हीडिओ धवनने केला आहे.
कर्नाटकातील चमत्कारी बाबा लड्डू मुत्याचे अनेक भक्त आहेत. पण आता आणखी एक व्यक्ती हाताने फिरणारा पंखा थांबवून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्याला लोक आधुनिक लड्डू मुत्या बाबा म्हणत आहेत. शिखर धवनने एका व्हिडिओद्वारे या आधुनिक लड्डू मुत्या बाबाची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा – IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज
या व्हिडिओमध्ये शिखर धवन खुर्चीवर बसला असून ती खुर्ची तीन लोकांनी उचलली आहे.. मग धवन हळू हळू तो फिरणारा पंखा हाताने थांबवतो. यानंतर तो दोन जणांना आशीर्वाद देत त्यांना शांत करतो. धवनचा अभिनय पाहून चाहत्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. शिखर धवनने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “पंखा वाले बाबा की जय हो”.
आधुनिक लड्डू मुत्या बाबा हाताने फिरणारा पंखा थांबवत त्याच हाताने सर्वांना आशीर्वाद देतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच ट्रेंडिंग व्हीडिओवरून शिखर धवनने हा व्हीडिओ बनवून शेअर केला आहे. शिखर धवनच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिखर धवनने याआधीही असे अनेक व्हीडिओ शेअर केले होते, जे चांगलेच व्हायरल झाले होते. या व्हीडिओमध्ये तो आपल्या कुटुंबाबरोबर डान्स आणि मस्ती करताना दिसतो. हल्लीच त्याने ख्रिस गेलबरोबर डान्स करतानाचा एक व्हीडिओ शेअऱ केला होता. कधी तो वडिलांबरोबर मस्ती करताना तर कधी मित्रांबरोबर व्हिडिओ बनवताना दिसतो. भारताच्या विजयानंतरही आनंद साजरा करताना त्याने ड्रेसिंग रूममधील व्हीडिओही शेअर केले होते.