Shikhar Dhawan’s new video of getting a call from his wife: काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. धवन आणि मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी देताना न्यायालयाने त्यांच्या पत्नीने ‘मानसिक क्रूरता’ केल्याचे मान्य केले आहे. आता तो पत्नीपासून वेगळा राहत आहे. दरम्यान, गब्बरचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नीबद्दल बोलताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आज मला माझ्या पत्नीचा फोन आला होता’

शिखऱ धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गब्बर म्हणताना दिसत आहे की, “आज माझ्या पत्नीने फोन केला होता, ती रडत होती आणि माफी मागत होती. ती म्हणत होती बाबू मला माफ कर, तू सांगशील तसं मी करीन, तू म्हणशील तसं राहीन. फक्त घरी ये. तिचे बोलणे ऐकून मलाही आनंद झाला. म्हणजे ती कोणाची बायको होती माहीत नाही, पण ती खूप छान होती. देव प्रत्येकाला अशी पत्नी देवो.” खरं तर या व्हिडीओंमध्ये पार्श्‍वभूमीवर एक संवाद आहे, ज्यावर शिखर धवन फक्त अभिनय करताना दिसत आहे.

वीरेंद्र सेहवागलाही आवडला व्हिडीओ –

शिखर धवनचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यात तो अनुभवी अभिनेत्यासारखा अभिनय करताना दिसत आहे. तासाभरात वीरेंद्र सेहवागसह जवळपास एक लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. पंजाब किंग्जचा खेळाडू हरप्रीत ब्रारने यावर भाष्य केले आहे. त्याने एक हसणारा इमोजी शेअर केला आणि लिहिले ‘पाजी’.

हेही वाचा – World Cup 2023: ‘लोकांनी मला देशद्रोही ठरवले होते, आता…’; बाबर आझमच्या कर्णधारपदावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

गब्बर आपला मुलगा जोरावर मिस करताना दिसला होता –

यापूर्वी शिखरने त्याचा मुलगा जोरावरसोबत व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावर गब्बरने गुलजार यांच्या कवितांचा समावेश केला होता. ज्यामध्ये लिहिले होते की ‘तुझ्याशिवाय एक विचित्र निराशा आहे.’ धवन आपल्या मुलाला खूप मिस करत आहे. न्यायालयाने त्याला सध्या मुलाचा ताबा दिला नसून, त्याला ऑस्ट्रेलिया आणि भारतात वेळ घालवण्याची परवानगी दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawans new video of getting a call from his wife is viral on instagram vbm