Shimron Hetmyer Catch Suryakumar Yadav Video Viral: वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव केला. पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी आश्चर्यकारक कामगिरी करत भारताला १४५ धावांवर रोखले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ६ गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या. भारतासाठी हे लक्ष्य सोपे होते, पण ओबेड मॅकॉय, जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारताकडून विजय हिसकावून घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात शिमरॉन हेटमायरने सामन्याला कलाटणी देणारा झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, शिमरन हेटमायरने सूर्यकुमार यादवचा अप्रतिम झेल घेत भारताच्या विजया मिळवण्याचा आशांना मोठा धक्का दिला. हेटमायरने होल्डरच्या चेंडूवर हवेत डायव्हिंग करत सनसनाटी झेल घेऊन वेस्ट इंडिजच्या आशा उंचावल्या. सूर्या बाद झाल्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली. या झेलनंतर वेस्ट इंडिज संघाने शानदार पुनरागमन केले.

वास्तविक, भारताच्या डावाच्या १०व्या षटकापर्यंत सूर्या आणि तिलक क्रीजवर खेळत होते, तेव्हा सामना पूर्णपणे भारताच्या नियंत्रणात होता. पण १०व्या षटकात होल्डरने सूर्याला आमिष दाखवून कव्हरच्या दिशेने शॉट मारण्यासाठी आमंत्रित केले. सूर्या होल्डरच्या जाळ्यात अडकला आणि कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना तो चेंडू जमिनीवर ठेवू शकला नाही, अशा स्थितीत चेंडू हवेत होता. तेव्हा कव्हरवर उभ्या असलेल्या हेटमायरने डायव्हिंग करून सूर्याचा झेल घेतला. त्यामुळे सूर्यकुमार यादवची खेळी संपुष्टात आली. तत्पुर्वी तिलक वर्मा आणि सूर्या यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी झाली होती.

हेही वाचा – IND vs WI 1st T20: युजवेंद्र चहलला फलंदाजीपासून द्रविड-पांड्याने रोखताच अंपायरने केला हस्तक्षेप, पाहा VIDEO

भारताला विजयासाठी शेवटच्या पाच षटकात ३७ धावा करायच्या होत्या. त्यावेळी संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा होती. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन क्रीजवर होते. इथून टीम इंडिया सहज टार्गेट चेस करेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. हार्दिक पांड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. त्यानंतर संजू सॅमसन धावबाद होताच संघाच्या आशा संपुष्टात आल्या. अर्शदीपने अखेरच्या षटकात काही नेत्रदीपक फटके मारले, मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत. उभय संघांमधील मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ ऑगस्ट) गयाना येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shimron hetmyer catching suryakumar yadav has video gone viral in ind vs wi 1st t20 vbm